'माझा मित्र वर गेलाय, मी त्याच्याकडे जातोय...';काँग्रेस आमदाराच्या 17 वर्षीय मुलाची गोळी झाडून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 08:12 PM2021-11-12T20:12:07+5:302021-11-12T20:16:06+5:30

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

Congress MLA Sanjay Yadav's 17-year-old son commits suicide by shooting in head | 'माझा मित्र वर गेलाय, मी त्याच्याकडे जातोय...';काँग्रेस आमदाराच्या 17 वर्षीय मुलाची गोळी झाडून आत्महत्या

'माझा मित्र वर गेलाय, मी त्याच्याकडे जातोय...';काँग्रेस आमदाराच्या 17 वर्षीय मुलाची गोळी झाडून आत्महत्या

Next

जबलपूर:मध्य प्रदेशातील जबलपूरच्या बारगीचे काँग्रेस आमदार संजय यादव यांच्या मुलाने गुरुवारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. विभव यादवने वडिलांच्या परवाना असलेल्या बंदुकीने स्वत:वर गोळी झाडून जीव संपवले. अवघ्या 17 वर्षीय मुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. पण, यामागचे कारण आता समोर आले आहे.

विभवने स्वतःवर गोळी झाडल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावरुन 4 पानी सुसाईड नोट सापडली आहे. त्यात त्याने आपल्या आत्महत्येचे कारण सांगितले असून, आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरण्यात आलेले नाही. 

सुसाईड नोटमध्ये काय आहे?
एसपी रोहित कासवानी यांनी सांगितले की, विभव सत्य प्रकाश हा मदन महल स्कूलमध्ये 12वीत शिकत होता. तो मानसशास्त्राचा विद्यार्थी होता. घटनास्थळवार पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली, त्याचा संपूर्ण तपशील पोलिसांनी सांगितला नसला तरी, त्यातील काही भाग समोर आला आहे. सुसाईड नोटमध्ये विभवने लिहिले की, 'आई-वडील खूप चांगले आहेत. माझे सर्व मित्र खूप छान आहेत. पण, माझा एक अत्यंत जवळचा मित्र या जगात नाही, तो वर गेलाय. आता मी पण त्याच्याकडे जात आहे.' ही सुसाईड नोट त्याने आपल्या 5 मित्रांना मेसेज केली होती. त्यांना सांगितले की तुम्ही लोक खूप चांगले आहात, आता मी निघतो.

घटनेदरम्यान नोकर घरात एकटाच होता
आमदार संजय यादव यांचा लहान मुलगा विभव (17) ने राहत्या घरात स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेदरम्यान घरात तो आणि नोकर होते. आई सीमा काही कामानिमित्त भोपाळला गेली होती, तर वडील बैठकीसाठी बाहेर गेले होते. मोठा मुलगा समर्थ यादवदेखील पेट्रोल पंपावर गेला होता. दुपारी 1.30 वाजता घराच्या पहिल्या मजल्यावरून पिस्तुलातून गोळी झाडल्याचा आवाज आला. नोकर ताबडतोब आला तेव्हा विभव रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तात्काळ भंडारी रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

संजय यादव पहिल्यांदाच आमदार झाले आहेत
2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्या प्रतिभा सिंह यांचा पराभव करून संजय यादव पहिल्यांदा आमदार झाले. घटनेनंतर काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तनखा, भाजप आमदार सुशील तिवारी उर्फ ​​इंदू तिवारी, काँग्रेस आमदार तरुण भानोत हे आमदार संजय यादव यांच्या घरी पोहोचले.

Web Title: Congress MLA Sanjay Yadav's 17-year-old son commits suicide by shooting in head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.