काँग्रेस आमदाराने भाजपा नेत्याच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 01:29 PM2018-08-26T13:29:43+5:302018-08-26T13:31:13+5:30
मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात काँग्रेस आमदार उमंग सिंघार यांनी पोलीस आणि जनतेसमोर एका भाजपा नेत्याच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे.
Next
धार - मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात काँग्रेस आमदार उमंग सिंघार यांनी पोलीस आणि जनतेसमोर एका भाजपा नेत्याच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धार जिल्ह्यातील टांडा गावात हा संपूर्ण प्रकार घडला.
#WATCH: Congress MLA Umang Singhar (in white shirt) attacks a BJP leader in Dhar. #MadhyaPradesh (25.08.18) pic.twitter.com/8WU1ADka0q
— ANI (@ANI) August 26, 2018
काही दिवसांपूर्वी टांडा गावात वीजेची तार तुटल्याने शॉक लागून एका मुलीचा मृत्यू झाला होता. मृत मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी भाजपाचे काही नेतेमंडळी आणि कार्यकर्ते आले होते. त्याचदरम्यान मदतीचा चेक देण्यासाठी काँग्रेसचे आमदार उमंग सिंघार हे देखील आपल्या समर्थकांसह उपस्थित होते. त्यावेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. सिंघार यांनी भाजपाच्या नेत्याला धक्काबुक्की करत कानशिलात लगावली.