राहुल गांधींचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पत्र; हाथरस दुर्घटनेबाबत केली मोठी मागणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 12:26 PM2024-07-07T12:26:37+5:302024-07-07T12:32:03+5:30

Hathras Stampede : हाथरस दुर्घटनेबाबत काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. 

congress mp rahul gandhi write letter to cm yogi adityanath on hathras stampede  | राहुल गांधींचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पत्र; हाथरस दुर्घटनेबाबत केली मोठी मागणी!

राहुल गांधींचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पत्र; हाथरस दुर्घटनेबाबत केली मोठी मागणी!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे २ जुलै रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. याठिकाणी भोले बाबांच्या सत्संगाला अनेक राज्यांतून महिला आणि पुरुषांनी हजेरी लावली होती. यादरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली, त्यात लहान मुलांसह १२१ जणांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेबाबत काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. 

राहुल गांधी यांनी एका पत्राद्वारे पीडितेच्या कुटुंबीयांच्या समस्या मुख्यमंत्र्यांना सांगितल्या आहेत. याशिवाय, नुकसान भरपाईची रक्कम वाढवून पीडित कुटुंबीयांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राहुल गांधींनी मुख्यमंत्री योगींना पत्र लिहिलं आहे की, या दुःखाच्या वेळी त्यांना आमच्या सामूहिक संवेदना आणि मदतीची गरज आहे. राहुल गांधी यांनी या पत्राची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) देखील पोस्ट केली आहे.

या दुर्घटनेत जीव गमावलेल्या आणि जखमींना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईवरही राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारने जाहीर केलेली भरपाई खूपच कमी असल्याचे राहुल गांधी यांनी पत्राद्नारे सांगितले आहे. तसेच, अशा परिस्थितीत ही नुकसान भरपाई त्वरित वाढवावी. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याची व्यवस्था करावी, असे राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून सांगितले आहे.

दोषींना कठोर शिक्षा होणे गरजेचं - राहुल गांधी
याचबरोबर, राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, जेव्हा मी हाथरस आणि अलीगढमध्ये पीडित कुटुंबाला भेटलो, तेव्हा त्यांनी सांगितले की, या घटनेत स्थानिक प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि असंवेदनशीलता आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणाची योग्य आणि पारदर्शक चौकशी व्हायला हवी. न्यायाच्या दृष्टिकोनातून दोषींना कठोर शिक्षा होणेही गरजेचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

Web Title: congress mp rahul gandhi write letter to cm yogi adityanath on hathras stampede 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.