"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 19:14 IST2024-06-02T19:14:21+5:302024-06-02T19:14:44+5:30
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीदेखील या एक्झिट पोलला फेक म्हटले आणि इंडिया आघाडीचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
Congress on Lok Sabha Exit Polls : लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपताच एक्झिट पोल समोर आले, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील NDA ला प्रचंड बहुमत मिळणार असल्याचे म्हटले आहे. तर, विरोधक हे एक्झिट पोल बनावट असल्याची टीका करत आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीदेखील या एक्झिट पोलला फेक म्हटले आणि इंडिया आघाडीचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
'पंतप्रधान काँग्रेसचाच असेल'
मीडियाशी संवाद साधताना जयराम रमेश म्हणाले, इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर सर्वात मोठ्या पक्षाचा, म्हणजेच काँग्रेसचा पंतप्रधान होईल. 4 जून रोजी नरेंद्र राजीनामा देतील आणि 5 जून रोजी इंडिया आघाडी पंतप्रधानाचे नाव जाहीर करेल. एनडीएतील अनेक प्रादेशिक पक्ष आमच्या संपर्कात आहेत. काहींनी थेट माझ्याशी संपर्क साधून सोबत येण्यची इच्छा व्यक्त केली आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
'एक्झिट पोलमध्ये अटलजी अन् पंतप्रधान...'
एक्झिट पोलबाबत बोलताना ते म्हणाले की, एक्झिट पोल बनावट आणि बोगस आहे. सर्व एक्झिट पोल एकसमान डेटा देत आहेत. इंडिया आघाडी 295 पेक्षआ जास्त जागा जिंकणार आहे. 2004 मध्ये काय झाले? एक्झिट पोलमध्ये अटलजी जिंकत असल्याचे दाखवले होते, पण नंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. पंतप्रधान मोदी ज्या बैठका घेत आहेत, त्या केवळ मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.