राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग! पायलट राहुल गांधींना भेटले तर सोनिया गांधींची गहलोत यांच्याशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 08:44 AM2021-09-21T08:44:14+5:302021-09-21T08:46:58+5:30

Congress politics : चार दिवसांपूर्वी पीसीसीचे माजी प्रमुख सचिन पायलट यांनी (Sachin Pilot) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली होती.

congress politics sonia gandhi talks to ashok gehlot pilot meets rahul political meaning | राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग! पायलट राहुल गांधींना भेटले तर सोनिया गांधींची गहलोत यांच्याशी चर्चा

राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग! पायलट राहुल गांधींना भेटले तर सोनिया गांधींची गहलोत यांच्याशी चर्चा

Next
ठळक मुद्दे सचिन पायलट आणि राहुल गांधी यांच्यात जवळपास दीड तास बैठक झाल्याचे सांगितले जाते. सोनिया गांधी यांनी अशोक गेहलोत यांच्याशी राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याचे बोलले जात आहे.

जयपूर : पंजाबमधील राजकीय घडामोडींनंतर (Punjab political crisis) आता राजस्थानमध्ये (Rajasthan) वेगाने सुरू असलेल्या राजकीय हालचालींदरम्यान सूत्रांच्या हवाल्याने एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) से यांच्याशी दूरध्वनीद्वारे राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

चार दिवसांपूर्वी पीसीसीचे माजी प्रमुख सचिन पायलट यांनी (Sachin Pilot) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता राजकीय विश्लेषक या चर्चा आणि भेटीला राज्यातील नवीन राजकीय समीकरणांचे संकेत मानत आहेत. पंजाबमधील घडामोडींनंतर राजस्थान आणि छत्तीसगडमधील राजकीय परिस्थितीवर लोकांचे लक्ष आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. यावेळी सोनिया गांधी यांनी अशोक गहलोत यांच्याशी राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याचे बोलले जात आहे. या दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारासह संघटनेच्या मुद्यावरही चर्चा झाली आहे. 

दरम्यान, या चर्चेच्या तीन दिवस आधी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी सचिन पायलट यांनी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली होती. सचिन पायलट आणि राहुल गांधी यांच्यात जवळपास दीड तास बैठक झाल्याचे सांगितले जाते. पंजाबमधील घडामोडींनंतर सध्याच्या परिस्थितीत सचिन पायलट आणि राहुल गांधी यांची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जवळजवळ वर्षानंतर दोघांची भेट झाली.

मंत्रिमंडळ आणि पक्ष संघटनेत बदल होण्याची शक्यता
राहुल गांधी आणि सचिन पायलट यांच्या या बैठकीत राजस्थानच्या राजकीय परिस्थितीसह तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. सूत्रांचा दावा आहे की, दोघांच्या बैठकीत राजस्थानमधील पक्ष संघटना आणि मंत्रिमंडळातील बदल आणि सचिन पायलट यांची स्वतःची भूमिका यावर चर्चा झाली. पुढील महिन्यापर्यंत मंत्रिमंडळ आणि संघटनेत बदल होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच, हे सर्व आधीच निश्चित असल्याचे सांगितले जात आहे.

आचार्य प्रमोद कृष्णन यांचे ट्विट
काँग्रेस पार्टी फक्त मुख्यमंत्री अशोक गहलोत हे बरे होण्याची वाट पाहत आहे. अशोक गहलोत यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली असून ते पुन्हा आपल्या कामात सक्रीय झाले आहेत. या सर्व घडामोडींमध्ये प्रियंका गांधींचे निकटवर्तीय समजले जाणारे आचार्य प्रमोद कृष्णन यांनीही ट्विट करून त्यात भर घातली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, पंजाबचे वारे राजस्थान आणि छत्तीसगडमधील हवामान खराब करू शकतात.

Web Title: congress politics sonia gandhi talks to ashok gehlot pilot meets rahul political meaning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.