Congress President Election: 'बकरीद में बचेंगे तो मोहर्रम में नाचेंगे', मल्लिकार्जुन खर्गेंच्या विधानावर भाजपचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 08:42 PM2022-10-12T20:42:09+5:302022-10-12T20:42:17+5:30

Congress President Election: काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल? या प्रश्नावर खर्गेंनी दिलेले उत्तर चर्चेत आहे.

Congress President Election: BJP objects to Mallikarjun Kharge's statement 'Bakrid Mein Bachenge To Moharram Mein Nachenge' | Congress President Election: 'बकरीद में बचेंगे तो मोहर्रम में नाचेंगे', मल्लिकार्जुन खर्गेंच्या विधानावर भाजपचा आक्षेप

Congress President Election: 'बकरीद में बचेंगे तो मोहर्रम में नाचेंगे', मल्लिकार्जुन खर्गेंच्या विधानावर भाजपचा आक्षेप

googlenewsNext

Congress President Election:काँग्रेसचे पक्षाध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे सध्या विविध राज्यात दौरे करुन कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. बुधवारी खर्गे भोपाळमध्ये होते, यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पत्रकारांनी विचारले की, येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? त्यावर ते म्हणाले की, 'बकरीदमध्ये टिकलात तर मोहरममध्ये नाचाल'(बकरीद में बचेंगे तो मोहर्रम में नाचेंगे).

खर्गेंच्या विधानावर भाजपचा आक्षेप
खर्गेंच्या वक्तव्यावरून राजकारण सुरू झाले आहे. भाजपने त्यांच्यावर मुस्लिमांचा अपमान केल्याचा आरोप केला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ट्विट केले - काँग्रेस परिवाराने निवडलेल्या पहिल्या प्रॉक्सी अध्यक्ष उमेदवाराला 2024 मध्ये काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असेल, असे विचारण्यात आले होते. यावर त्याचे उत्तर होते, "बकरीदमध्ये टिकलात तर मोहरममध्ये नाचाल. पण, मोहरम हा उत्सव नसून शोक आहे. हा मुस्लिमांचा मोठा अपमान आहे,'' अशी टीका त्यांनी केली.

'काँग्रेसमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणूक होते'
खर्गे म्हणाले की, 'काँग्रेस पक्षाने अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. काँग्रेस हा देशातील एकमेव राजकीय पक्ष आहे, जिथे पक्षाच्या अध्यक्षाची निवड कार्यकर्त्यांकडून लोकशाही पद्धतीने केली जाते. या निवडणुकीत उमेदवार म्हणून मला तुमच्या मताची आणि पाठिंब्याची अपेक्षा आहे. इंदिरा गांधी यांच्या हस्ते संस्थेत पहिल्यांदाच पद बहाल करण्यात आले. विद्यार्थी नेत्यापासून ते राज्यसभेतील LoP पर्यंतचा माझा प्रवास आहे. काँग्रेसने माझ्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे. आज मी पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असल्याने तुमचा पाठिंबा मागतो आहे. तुमच्या विश्वासाने मी माझ्या क्षमतेनुसार पक्षाची सेवा करत राहीन,' असे ते म्हणाले.

17 ऑक्टोबरला मतदान, 19 रोजी निकाल लागेल
राष्ट्रपती निवडीची अधिसूचना 22 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय निवडणूक प्राधिकरण या मतदानावर देखरेख करत आहे. 8 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. आता पक्षाध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर निवडणुकीचा निकाल 19 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.

Web Title: Congress President Election: BJP objects to Mallikarjun Kharge's statement 'Bakrid Mein Bachenge To Moharram Mein Nachenge'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.