Congress President Election: 'माझं भविष्य खर्गे ठरवतील...', निकालापूर्वीच राहुल गांधींकडून पक्षाध्यक्षाच्या नावाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 05:46 PM2022-10-19T17:46:35+5:302022-10-19T17:47:49+5:30

काँग्रेसची निवडणूक पारदर्शक आणि निष्पक्ष असल्याचा दावा काँग्रेस नेते करत आहेत, मात्र मतमोजणीपूर्वीच राहुल गांधींनी विजयी उमेदवाराचे नाव घेतले.

Congress President Election: 'Kharge will decide my future...', Rahul Gandhi reveals the name of party president before results | Congress President Election: 'माझं भविष्य खर्गे ठरवतील...', निकालापूर्वीच राहुल गांधींकडून पक्षाध्यक्षाच्या नावाचा खुलासा

Congress President Election: 'माझं भविष्य खर्गे ठरवतील...', निकालापूर्वीच राहुल गांधींकडून पक्षाध्यक्षाच्या नावाचा खुलासा

googlenewsNext

Congress President Election: सूमारे दोन दशकानंतर काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच पक्षाला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळाला आहे. मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यावर दणदणीत विजय मिळवला आहे. ही निवडणूक पारदर्शक आणि निष्पक्ष असल्याचा दावा काँग्रेस नेते करत आहेत, पण बुधवारी मतमोजणीपूर्वीच पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला.

संबंधित बातमी- शशी थरूर यांच्या मल्लिकार्जून खर्गेंना शुभेच्छा; म्हणाले- 'पक्षाला नव्याने बळ देण्याचे काम आजपासून सुरू...'

दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालय मतमोजमी सुरू होती, तेव्हा राहुल गांधी आंध्र प्रदेशातील अडोनीणध्ये पत्रकार परिषद घेत होते. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “कांग्रेस अध्यक्षाकडे पक्षाचे सर्वोच्च अधिकार आहेत. पक्षातील प्रत्येक सदस्य अध्यक्षाला रिपोर्ट करेल. पक्षाचे नवीन अध्यक्ष माझी पक्षातील भूमिका ठरवतील. तुम्ही मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधींना विचारू शकता.”

निकालापूर्वीच खर्गेंचे नाव घेतले
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच राहुल गांधींनी खर्गे यांचे नाव घेतल्याने नवीन चर्चा सुरू झाल्या आहेत. पण नंतर आपले शब्द दुरुस्त करत राहुल म्हणाले की, “ज्या कोणाची निवड होईल, तो ठरवेल. खर्गे आणि थरूर हे अफाट अनुभव आणि समजूतदारपणा असलेले लोक आहेत, त्यांना माझ्या सल्ल्याची गरज नाही.”

मल्लिकार्जुन खर्गे नवे अध्यक्ष 
राहुल गांधी यांनी अध्यक्षपदी खर्गे यांचे नाव घेतल्यानंतर काही वेळातच निकाल जाहीर झाला आणि खर्गे यांना अधिकृतपणे अध्यक्ष घोषित करण्यात आले. निवडणुकीत खरगे यांना 7,897 मते मिळाली तर शशी थरूर यांना 1,072 मते मिळाली. निवडणूक जिंकल्यानंतर 24 वर्षांनंतर खर्गे हे पहिले बिगर गांधी अध्यक्ष असतील.
 

Web Title: Congress President Election: 'Kharge will decide my future...', Rahul Gandhi reveals the name of party president before results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.