Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी KN Tripathi यांचा अर्ज बाद, 'हे' आहे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2022 06:10 PM2022-10-01T18:10:30+5:302022-10-01T18:11:51+5:30

आता मल्लिगार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत

Congress President Election KN Tripathi nomination rejected now Mallikarjun Kharge vs Shashi Tharoor contest | Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी KN Tripathi यांचा अर्ज बाद, 'हे' आहे कारण

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी KN Tripathi यांचा अर्ज बाद, 'हे' आहे कारण

Next

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक सध्या चर्चेत आहे. पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत. पण त्याचवेळी या निवडणुकीशी संबंधित काही मोठ्या बातम्या समोर येत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी अर्ज भरला नाही. पण झारखंडचे माजी मंत्री केएन त्रिपाठी (KN Tripathi) यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. पण त्यांचा अर्ज शनिवारी फेटाळण्यात आल्याने पक्षाचे दोन दिग्गज मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात आता सामना रंगणार आहे.

केएन त्रिपाठी यांचा अर्ज का नाकारला?

तिन्ही नेत्यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर होती. दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, उमेदवारी प्रक्रियेदरम्यान एकूण २० फॉर्म प्राप्त झाले होते आणि त्यापैकी चार नाकारण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, खर्गे यांनी १४ अर्ज भरले होते, तर थरूर यांनी पाच आणि त्रिपाठी यांनी एक फॉर्म भरला होता. मिस्त्री म्हणाले की, त्रिपाठी यांचा फॉर्म नाकारण्यात आला कारण त्यांच्या एका प्रस्तावकाची स्वाक्षरी जुळली नाही आणि दुसर्‍या प्रस्तावकाची स्वाक्षरी म्हणजे डुप्लिकेशन होते.

कोण आहेत KN त्रिपाठी?

केएन त्रिपाठी यांचे पूर्ण नाव कृष्णानंद त्रिपाठी आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत डाल्टनगंज विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस उमेदवार म्हणून फॉर्म भरताना त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, ते ४१ कोटींच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचे मालक आहेत. झारखंडमधील काँग्रेसच्या बोलक्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. ५० वर्षीय त्रिपाठी यांनी सुमारे नऊ वर्षे हवाई दलात सेवा केल्यानंतर २००० सालापासून झारखंडमधील पलामू परिसरात सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. २००९ मध्ये ते डाल्टनगंजमधून आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी राज्य सरकारमध्ये ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम केले. यानंतर ते कधीही विधानसभा निवडणुकीत जिंकू शकले नाहीत, मात्र त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि पक्षाबाहेरील त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ते चर्चेत राहिले.

Web Title: Congress President Election KN Tripathi nomination rejected now Mallikarjun Kharge vs Shashi Tharoor contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.