Congress President Election: '...म्हणून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला; देशाला मजबूत काँग्रेस हवीये'- शशी थरूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 05:57 PM2022-10-16T17:57:37+5:302022-10-16T17:57:58+5:30

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर 19ला निकाल समोर येईल.

Congress President Election: 'Rahul denied, so I decided to contest election; The country needs a strong Congress'- Shashi Tharoor | Congress President Election: '...म्हणून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला; देशाला मजबूत काँग्रेस हवीये'- शशी थरूर

Congress President Election: '...म्हणून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला; देशाला मजबूत काँग्रेस हवीये'- शशी थरूर

Next

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोमवारी मतदान होणार आहे. मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच आज शशी थरूर त्यांच्या प्रचारासाठी लखनौला पोहोचले आणि तिथे त्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यांशी संवाद साधला. यावेळी थरूर म्हणाले की, त्यांना आधीच लखनौला यायचे होते, पण समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांच्या निधनामुळे ते येऊ शकले नाहीत. यावेळी त्यांनी पीसीसीच्या सर्व सदस्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

ते म्हणाले की, 22 वर्षांनंतर अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. राहुल गांधींनी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय घेतला, त्यामुळेच मला निवडणूक विचार करावा लागला. पक्षात सतत चढ-उतार होत असून त्यामुळे अनेक बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. आता काँग्रेसचे अस्तित्व वाचवायचे आहे, त्यामुळे काँग्रेसला बळकट करावे लागेल. हे काम एक कणखर अध्यक्षच करू शकतो. पक्षातील सर्व नेते विशेषत: युवा नेते बदलाची अपेक्षा करत आहेत, असेही ते म्हणाले.

पक्षाच्या बलिदानाची आठवण करून दिली
पक्षाच्या बलिदानाची आठवण करून देत थरूर म्हणाले की, आमच्या पक्षाच्या दोन पंतप्रधानांच्या हत्येनंतरही आमचे मनोबल नेहमीच उंच राहिले आहे. आमच्यात पक्ष चालवण्याची हिंमत आहे. सर्व नेत्यांनीही देश सांभाळला आहे. पक्षाचे कार्यकर्ते सध्या केंद्रीय नेतृत्वावर खूश नसल्याचेही थरूर म्हणाले. त्यांचा आवाज ऐकावा लागेल आणि त्यांच्या मागणीनुसार पक्षांतर्गत बदल करावे लागतील, असेही थरूर म्हणाले.

फॉर्म भरण्यापूर्वी सोनिया गांधी यांची भेट घेतली
पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यापूर्वी सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचेही थरूर यांनी सांगितले. सोनियांसमोर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यांनीच निवडणूक लढवण्यास सांगितले होते. त्यामुळेच मी पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्पक्षपणे निवडणूक लढत आहे, असेही थरूर म्हणाले. 
 

Web Title: Congress President Election: 'Rahul denied, so I decided to contest election; The country needs a strong Congress'- Shashi Tharoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.