Congress President: काँग्रेस अध्यक्षाचे नाव ठरले? CM अशोक गहलोत यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले..?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 02:48 PM2022-09-07T14:48:13+5:302022-09-07T14:49:46+5:30

Bharat Jodo Yatra: काँग्रेस आज कन्याकुमारीतून 'भारत जोडो यात्रा' सुरू करत आहे. तत्पुर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पक्षाध्यक्षपदाबाबत महत्वाची माहिती दिली.

Congress President: Name of Congress President decided? Big statement by CM Ashok Gehlot; said..? | Congress President: काँग्रेस अध्यक्षाचे नाव ठरले? CM अशोक गहलोत यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले..?

Congress President: काँग्रेस अध्यक्षाचे नाव ठरले? CM अशोक गहलोत यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले..?

Next

Next Congress President:काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'पूर्वी पक्षाध्यक्षाच्या नावाबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत महत्वाचे वक्तव्य केले. बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, 'देशातील जातीय ध्रुवीकरणाला विरोध करण्यासाठी काँग्रेस देशभर यात्रा करत आहे. राहुल गांधी पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष व्हावेत, अशी आमची इच्छा आहे.' 

'देशात गृहयुद्धाची परिस्थिती'
कन्याकुमारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना गेहलोत म्हणाले की, 'भाजपची धोरणे देशाचे विभाजन करणारी आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर लोकांच्या जीवाची भीती निर्माण होईल. या धोकादायक धोरणांमुळे देश गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर येऊ शकतो, पण काँग्रेस हे होऊ देणार नाही. ध्रुवीकरणाचा सामना, हा या यात्रेचा प्रमुख मुद्दा आहे.' 

राहुल यांचे मन वळवणार
गेहलोत पुढे म्हणाले, 'राहुल गांधी देश जोडणारा संदेश घेऊन पदयात्रेची सुरुवात करत आहेत. राहुल गांधी यांनी CWC नुसार काम करणार असल्याचे सांगितले आहे. आव्हाने मोठी असल्याने पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आम्ही त्यांचे मन वळवू. पक्ष जातीय सलोख्यासाठी काम करत राहील. गांधी घराण्याकडे सर्वाधिक विश्वासार्हता आहे आणि त्यामुळेच भाजप या घराण्यातील लोकांना लक्ष्य करत आहे. राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत अशी संपूर्ण काँग्रेस पक्षाची इच्छा आहे.' असेही गहलोत म्हणाले.

Web Title: Congress President: Name of Congress President decided? Big statement by CM Ashok Gehlot; said..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.