काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक जूनमध्ये, कार्य समितीच्या बैठकीतील निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 02:00 AM2021-01-23T02:00:56+5:302021-01-23T06:47:15+5:30

अशोक गेहलोत, रजनी पाटील, अंबिका सोनी, हरीश रावत आदींचे म्हणणे होते की, सध्याच्या अध्यक्षाचा कार्यकाळ फक्त १८ महिने राहिला असल्यामुळे तेवढ्या दिवसांसाठी नवा अध्यक्ष का निवडायचा?  ग्रुप २३ मध्ये सहभागी असलेले नेते एकाच वेळी निवडणूक व्हावी यावर अडले होते.

Congress presidential election in June | काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक जूनमध्ये, कार्य समितीच्या बैठकीतील निर्णय

काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक जूनमध्ये, कार्य समितीच्या बैठकीतील निर्णय

googlenewsNext

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवडणूक येत्या जून महिन्यात घेण्याचा निर्णय शुक्रवारी पक्षाच्या झालेल्या कार्य समितीच्या बैठकीत झाला. मात्र, पी. चिदम्बरम, आनंद शर्मा, गुलामनबी आझाद यांना ही निवडणूक लवकरच करावी तसेच अध्यक्षाच्या निवडणुकीसोबत कार्य समितीचे सदस्य आणि केंद्रीय निवडणूक समितीचीही निवडणूक व्हावी, असे वाटते. 

अशोक गेहलोत, रजनी पाटील, अंबिका सोनी, हरीश रावत आदींचे म्हणणे होते की, सध्याच्या अध्यक्षाचा कार्यकाळ फक्त १८ महिने राहिला असल्यामुळे तेवढ्या दिवसांसाठी नवा अध्यक्ष का निवडायचा?  ग्रुप २३ मध्ये सहभागी असलेले नेते एकाच वेळी निवडणूक व्हावी यावर अडले होते.  असे संकेत मिळतात की, कार्य समिती सदस्यांची निवडणूक पक्ष अध्यक्षाच्या निवडणुकीसोबत घेण्यास पक्ष अनुकूल नाही.

गेहलोत -शर्मांत वाद
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाच्या विषयावरून सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या कार्य समितीच्या व्हर्च्युअल बैठकीत आनंद शर्मा आणि अशोक गेहलोत यांच्यात वाद झाला. गेहलोत यांच्या भाष्यावर आनंद शर्मा यांनी टीका केली. राहुल गांधी दाेघांनाही ‘पुढे व्हा’ म्हणाले. 

सूत्रांनुसार जेव्हा राहुल गांधी समर्थकांनी पक्षाच्या निवडणुका जून महिन्यापर्यंत लांबणीवर टाकण्याचा विषय काढून आता पक्षाच्या नेत्यांना गांधी कुटुंबावर विश्वास राहिला नाही का, असे विचारल्यावर वाद सुरू झाला. गेहलोत यांच्या भाष्यावर  आनंद शर्मा यांनी टीका केली. बैठकीत उशिरा सहभागी झालेले राहुल गांधी दोघांचेही बरोबर असल्याचे सांगून ‘पुढे पडा’ म्हणाले. 

Web Title: Congress presidential election in June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.