नवज्योत सिंग सिद्धूंना हायकमांडची सक्त ताकीद; राहुल आणि प्रियंका गांधी म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 10:11 PM2021-09-02T22:11:41+5:302021-09-02T22:12:49+5:30

पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना हायकमांडकडून सक्त ताकीद मिळाल्याची माहिती मिळाली आहे.

congress rahul and priyanka gandhi advice navjot singh sidhu to stop the war of the words | नवज्योत सिंग सिद्धूंना हायकमांडची सक्त ताकीद; राहुल आणि प्रियंका गांधी म्हणाले की...

नवज्योत सिंग सिद्धूंना हायकमांडची सक्त ताकीद; राहुल आणि प्रियंका गांधी म्हणाले की...

Next

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून पंजाबमधील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत असताना काँग्रेसमधील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर येत आहे. पंजाबमधील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी प्रभारी हरीश रावत यांनी पुढाकार घेतला. मात्र, त्यांच्या पदरी निराशा आल्याचे पाहायला मिळाले. हरीश रावत यांच्या पाठोपाठ दिल्लीत पोहोचलेले पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना हायकमांडकडून सक्त ताकीद मिळाल्याची माहिती मिळाली आहे. (congress rahul and priyanka gandhi advice navjot singh sidhu to stop the war of the words)

“BJP नेत्यांनी जवळच्या नशामुक्ती केंद्राशी संपर्क साधावा”; काँग्रेसचा खोचक टोला

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात यापूर्वी अनेकदा खटके उडाले आहेत. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीही करण्यात आली होती. मात्र, आपली ताकद पणाला लावून तसेच कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नाकावर टिच्चून नवज्योत सिंग सिद्धू पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बनले. वरवर परिस्थिती सामान्य वाटत असली, तरी सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. अखेर काँग्रेसमधील धुसपूस चव्हाट्यावर आली. यानंतर काँग्रेसचे पंजाबमधील प्रभारी हरीश रावत यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला फार यश आलेले दिसत नाही, असेही बोलले जात आहे. 

“केवळ महिला घरात असताना CBI ने कारवाई करणे चुकीचे”; सुप्रिया सुळेंची टीका

नवज्योत सिंग सिद्धूंची दिल्लीवारी

नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. यानंतर महासचिव प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली. या दोन्ही नेत्यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांना शाब्दिक युद्ध थांबवावे. तसेच पक्षातील अंतर्गत कलहाची सावर्जनिक मंचावर चर्चा करू नये. याशिवाय पक्षांतर्गत वादाबाबत सोशल मीडियावर आणू नये, अशा काही सूचना वजा सल्ले देण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नवज्योत सिंग सिद्धू पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर ट्विटरवर निशाणा साधताना दिसत आहेत. 

TATA चा धुमाकूळ! ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत नोंदवली ५३ टक्के वाढ; बड्या कंपन्यांना धोबीपछाड

दरम्यान, हरीश रावत यांनी चंदीगड दौऱ्यावेळी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना झुकते माप दिले. त्यांना अधिक महत्त्व दिले, याबाबत नवज्योत सिंग सिद्धू यांचे समर्थक नाराज असल्याचे सांगितले जात आहे.  
 

Web Title: congress rahul and priyanka gandhi advice navjot singh sidhu to stop the war of the words

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.