Rahul Gandhi : "भारतात आता कोणी पंतप्रधान मोदींना घाबरत नाही..."; राहुल गांधींचं भाजपा, RSS वर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 09:04 AM2024-09-09T09:04:48+5:302024-09-09T09:14:45+5:30

Congress Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल गांधी यांनी टेक्सासमध्ये एका कार्यक्रमात बोलताना भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Congress Rahul Gandhi america visit he addressed indian poeple in texas slams Narendra Modi | Rahul Gandhi : "भारतात आता कोणी पंतप्रधान मोदींना घाबरत नाही..."; राहुल गांधींचं भाजपा, RSS वर टीकास्त्र

Rahul Gandhi : "भारतात आता कोणी पंतप्रधान मोदींना घाबरत नाही..."; राहुल गांधींचं भाजपा, RSS वर टीकास्त्र

अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी टेक्सासमध्ये एका कार्यक्रमात बोलताना भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी म्हणाले, "आरएसएसला वाटतं की भारत हा एक विचार आहे आणि आम्हाला वाटतं की, भारत हा अनेक विचारांचा देश आहे. तसेच प्रत्येकाला यामध्ये सहभागी होण्याची, स्वप्न पाहण्याची परवानगी दिली पाहिजे. त्यांना परवानगी दिली पाहिजे आणि त्यांची जात, भाषा, धर्म, परंपरा विचारात न घेता जागा दिली पाहिजे."

टेक्सास येथे आयोजित या कार्यक्रमात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुढे म्हणाले की, "ही लढाई आहे आणि ही लढाई २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाली जेव्हा भारताच्या लाखो लोकांना समजलं की, पंतप्रधान भारताच्या संविधानावर हल्ला करत आहेत. मी तुम्हाला जे काही सांगितलं ते संविधानात आहे. आधुनिक भारताचा पाया संविधान आहे. हेच लोकांना निवडणुकीत स्पष्टपणे समजलं आणि मी ते घडताना पाहिलं."

"जेव्हा मी संविधानाबाबत बोलायचो, तेव्हा लोकांना मी काय म्हणतोय ते समजत होतं. ते म्हणत होते की, भाजपा आमच्या परंपरेवर हल्ला करत आहे. आमच्या भाषेवर हल्ला करत आहे. आमच्या राज्यांवर हल्ला करत आहे. त्यांना सर्वात महत्त्वाची गोष्ट समजली ती होती की, ती म्हणजे जो कोणी भारताच्या संविधानावर हल्ला करत आहे ते आपल्या धार्मिक परंपरेवरही हल्ला करत आहेत."

आपल्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, "जेव्हा मी संसदेतील माझ्या भाषणात अभयमुद्राचे वर्णन केले तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की ते निर्भयतेचे प्रतिक आहे आणि ते प्रत्येक भारतीय धर्मात आहे. मी हे सांगत होतो तेव्हा भाजपाला ते सहन होत नव्हतं. त्यांना समजत नाही आणि आम्ही त्यांना समजावणार आहोत. दुसरी गोष्ट घडली ती म्हणजे लोकांतून भाजपाची भीती नाहीशी झाली. निवडणूक निकालानंतर लगेचच, काही मिनिटांतच, भारतात कोणीही भाजाप किंवा भारताच्या पंतप्रधानांना घाबरत नाही, हे आपण पाहिलं. त्यामुळे हे मोठं यश आहे."

Web Title: Congress Rahul Gandhi america visit he addressed indian poeple in texas slams Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.