"नागरिकांच्या खिशातून हिसकावून घेतलेला पैसा जातोय कुठे, 23 लाख कोटी रुपये कुठे गेले?"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 05:22 PM2021-10-14T17:22:24+5:302021-10-14T17:24:59+5:30
Congress Rahul Gandhi And Modi Government : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली - देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किंमती या गगनाला भिडत आहे. याचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. जनतेला महागाईची झळ सहन करावी लागत आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारची तुलना थेट पुरातन लोककथांमधील भरमसाठ करवसुली करणाऱ्या सत्ताधाऱ्यांशी केली आहे. तसेच सुरुवातीला जनता दुःखी असली तरी शेवटी जनता हे सरकार संपवते असा इशारा देखील दिला आहे.
राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. मोदी सरकारने (Modi Government) गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या करातून जमा केलेले 23 लाख रुपये कुठं गेले? असा सवालही उपस्थित केला आहे. "पुरातन लोककथांमध्ये भरमसाठ करवसुली करणाऱ्या स्वार्थी सत्ताधाऱ्यांच्या गोष्टी होत्या. अशावेळी सुरुवातीला जनता दुखी होते, मात्र नंतर शेवटी हीच जनता हे सरकार संपवते. वास्तवातही असंच होणार" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच Tax Extortion) आणि Fuel Prices हे दोन हॅशटॅग देखील वापरले आहेत.
पुरानी लोककथाओं में ऐसे लालची कुशासन की कहानी होती थी जो अंधाधुंध टैक्स वसूली करता था। पहले जनता दुखी हो जाती लेकिन अंत में जनता ही उस कुशासन को ख़त्म करती थी।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 14, 2021
असलियत में भी ऐसा ही होगा।#TaxExtortion#FuelPricespic.twitter.com/qbB2NA4LEt
"नागरिकांच्या खिशातून जो पैसा हिसकावून घेतला जातोय तो पैसा जातोय कुठे?"
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी "केंद्र सरकारने 23 लाख कोटी रुपये जीडीपीतून कमावले आहेत. हा जीडीपी म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोल आहे. हे 23 लाख कोटी रुपये गेले कुठे हा माझा प्रश्न आहे. नागरिकांच्या खिशातून जो पैसा हिसकावून घेतला जात आहे हा पैसा कुठं जातोय हा प्रश्न जनतेने विचारायला हवा" असं म्हटलं आहे. याआधी देखील राहुल यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
"मंत्र्याची हकालपट्टी न करून भाजपाने न्याय प्रक्रियेत अडथळा आणला"; राहुल गांधींचा हल्लाबोल
"मंत्र्याची हकालपट्टी न करून भाजपाने न्याय प्रक्रियेत अडथळा आणला आहे. केंद्र सरकारला ना शेतकऱ्यांच्या कुटुंबांची काळजी आहे, ना हत्या झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांची" असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. तसेच KisanKoNyayDo हा हॅशटॅग देखील वापरला. भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. "नेतागिरी म्हणजे फॉर्च्यूनरने कोणालाही चिरडून टाकणे नाही" असं स्वतंत्र देव सिंह (BJP Swatantra Dev Singh) यांनी म्हटलं आहे.