"कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा, भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 03:11 PM2020-09-28T15:11:49+5:302020-09-28T15:30:45+5:30

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 

congress rahul gandhi attacks modi government on farmers law democracy | "कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा, भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा"

"कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा, भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा"

Next

नवी दिल्ली - शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभीकरण) विधेयक, 2020 आणि शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) करार किंमत आश्वासन आणि कृषीसेवा विधेयक, 2020 ही दोन कृषी विधेयके राज्यसभेत गदारोळात मंजूर करण्यात आली आहेत.  केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात विरोधकांसह शेतकरी संघटनांकडून आवाज उठवला जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 

"कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा आहेत. भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा" असं म्हणत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच कृषी विधेयकं मंजूर करताना उपसभापतींनी केलेल्या दाव्याचं त्यांनी खंडन केलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. विधेयकं मंजूर करताना विरोधक जागेवर बसले नाही असं राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी म्हटलं होतं. मात्र वेगळंच चित्र दिसत आहे. यावरून राहुल यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. 

"ना मोबदला, ना सन्मान; नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार"

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे एक ट्विट केलं आहे. "कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा आहेत. शेतकऱ्यांचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेरही चिरडला जात आहे. भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा" असं म्हणत राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. याआधीही राहुल यांनी कृषी  विधेयकावरून सरकारवर जोरदार टीका करत निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी "एका चुकीच्या वस्तू आणि सेवा कराने सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (MSME) संपवलं. आता नवे कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांना गुलाम बनवतील" असं म्हटलं होतं. 

"शेतकरी आपल्याच शेतात कामगार होईल"

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. "शेतकऱ्यांना कंत्राटी शेतीद्वारे अब्जाधीशांचं गुलाम बनवण्यास प्रवृत्त केलं जाईल. शेतकऱ्यांना ना मोबदला, ना सन्मान. शेतकरी आपल्याच शेतात कामगार होईल, भाजपाचं कृषी विधेयक ईस्ट इंडिया कंपनीची आठवण करून देत आहे. आम्ही हा अन्याय होऊ देणार नाही" असं प्रियंका यांनी म्हटलं होतं.

कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक, ट्रॅक्टर पेटवून व्यक्त केला निषेध

मोदी सरकारविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीच्या उच्च सुरक्षा विभागाअंतर्गत येणाऱ्या इंडिया गेटजवळ काही लोकांनी ट्रॅक्टरला आग लावल्याची घटना समोर आली आहे. कृषी विधेयकाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून ट्रॅक्टरला आग लावून त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. सोमवारी (28 सप्टेंबर) सकाळी इंडिया गेटजवळ ही घटना घडली आहे. ट्रॅक्टरला आग लावल्याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. ट्रॅक्टरला आग लावतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : बापरे! 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना; IIT रिसर्चमधून मोठा खुलासा

कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक, ट्रॅक्टर पेटवून व्यक्त केला निषेध; Video व्हायरल

CoronaVirus News : कोरोनामुळे जगभरात 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता

इटुकल्या पिटुकल्या उंदराने केली कमाल, मिळाला 'शौर्य' पुरस्कार; कामगिरी ऐकून व्हाल हैराण

करोडो लोकांच्या हितासाठी सरकारचं मोठं पाऊल, National Pension System चे बदलले नियम

"भारताला डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवतेय"

Web Title: congress rahul gandhi attacks modi government on farmers law democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.