GST: लोकांचे जीव जातायत, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली सुरूच; राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 12:25 PM2021-05-08T12:25:29+5:302021-05-08T12:27:44+5:30

GST: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

congress rahul gandhi criticises pm modi over gst | GST: लोकांचे जीव जातायत, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली सुरूच; राहुल गांधींची टीका

GST: लोकांचे जीव जातायत, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली सुरूच; राहुल गांधींची टीका

googlenewsNext
ठळक मुद्देराहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोलजीएसटीवरून केंद्रावर टीकादेश पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर - राहुल गांधी

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या परिस्थितीतही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. (congress rahul gandhi criticises pm modi over gst)

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधीपंतप्रधान मोदी आणि केंद्रावर वारंवार टीका करत आहेत. केंद्र सरकारची धोरणे, कोरोना परिस्थिती, लॉकडाऊन, लसीकरण यांसारख्या अनेक मुद्द्यांवरून राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. काँग्रेसशासित राज्यांनी कोरोना लसींवर आकारल्या जाणाऱ्या जीएसटीवर आक्षेप नोंदवला होता. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी टीका केली आहे. 

काय म्हणतात राहुल गांधी?

लोकांचे जीव जातायत पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली सुरूच आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिले होते. देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात असल्याचे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना सल्ला दिला आहे. तसेच सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर कोरोना लस उपलब्ध करून देण्याची विनंती देखील राहुल गांधींनी पंतप्रधानांना केली आहे. 

“शरद पवारांची बार मालकांसाठी कळकळ पाहून कंठ दाटून आला, शेतकऱ्यांसाठीही पत्राची अपेक्षा”

देश पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर

कोरोना व्हायरसच्या सर्व स्वरुपाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करण्यासोबतच संपूर्ण जगाला याबद्दल माहिती देण्याचा आग्रह राहुल गांधी यांनी या पत्राद्वारे केला आहे. केंद्र सरकारच्या अपयशामुळे देश पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तराच्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे, असा गंभीर आरोपही राहुल यांनी आपल्या पत्रातून केला आहे. अशावेळी गेल्या वर्षीसारखे गरिबांना कठीण प्रसंगाचा सामना करावा लागू नये, यासाठी तातडीने आर्थिक मदत पोहोचवण्यात यावी, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: congress rahul gandhi criticises pm modi over gst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.