Corona Vaccination: भारताला कोरोनाची लस मोफत मिळायलाच हवी; राहुल गांधींची आग्रही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 04:32 PM2021-04-29T16:32:00+5:302021-04-29T16:33:21+5:30

Corona Vaccination: काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा कोरोनाची लस मोफत मिळायला हवी, अशी आग्रही मागणी केली आहे.

congress rahul gandhi demands that india must get free corona vaccine | Corona Vaccination: भारताला कोरोनाची लस मोफत मिळायलाच हवी; राहुल गांधींची आग्रही मागणी

Corona Vaccination: भारताला कोरोनाची लस मोफत मिळायलाच हवी; राहुल गांधींची आग्रही मागणी

Next
ठळक मुद्देराहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोलकोरोना परिस्थितीवरून साधला निशाणा भारताला कोरोनाची लस मोफत मिळायलाच हवी - राहुल गांधी

नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठत असताना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. देशभरात १ मेपासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत असून, १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा कोरोनाची लस मोफत मिळायला हवी, अशी आग्रही मागणी केली आहे. (congress rahul gandhi demands that india must get free corona vaccine)

राहुल गांधींना कोरोनाची लागण झाली असून, ते सध्या गृहविलगीकरणात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत आहेत. कोरोनाची लस मोफत मिळण्यासंदर्भात राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विट करत आग्रही मागणी केली आहे. 

हॅशटॅग ब्लॉक करायला आम्ही फेसबुकला सांगितलं नाही; केंद्राचे स्पष्टीकरण

भारताला कोरोनाची लस मोफत मिळायलाच हवी

भारताला कोविडची लस मोफत दिली पाहिजे. सर्व नागरिकांना विनामूल्य रोगप्रतिबंधक लस टोचणे आवश्यक आहे. आशा करूया की यावेळी त्यांना ती मिळेल, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. यावेळी राहुल गांधी #vaccine हा हॅशटॅगही वापरला आहे. 

नवे संसद भवन महत्त्वाचे की नागरिकांचे लसीकरण? पवारांचा रोखठोक सवाल

भाजपाच्या सिस्टमचा विक्टिम बनवू नका

चर्चा खूप झाली. आता देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहिजे. बस्स. भारताला भाजपाच्या सिस्टमचा विक्टिम बनवू नका. मोदी सरकारने हे लक्षात घेणे आवश्यक आही की लढाई कोरोनाविरोधात आहे, काँग्रेस किंवा अन्य राजकीय विरोधकांविरुद्ध नाही, अशी टीका करणारे ट्विट राहुल गांधी यांनी यापूर्वी केले होते. 

लसीकरणाची किंमत समान हवी; मुंबई हायकोर्टाचा सुनावणी करण्यास नकार

दरम्यान, १८ ते ४४ वयोगटासाठी १ मे पासून लसीकरण सुरूच होणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. येत्या ६ महिन्यात १८ ते ४४ या वयोगटातल्या सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची समिती सूक्ष्म नियोजन करत आहे. लगेच आपल्याला लसीचे डोस उपलब्ध होणार नाहीत. मे अखेरपर्यंत जर लसीचे डोस उपलब्ध होणार असतील, तर त्यांना अचानक एकाच वेळी लसीचे डोस देता येणार नाहीत, असे टोपे यांनी सांगितले. 
 

Web Title: congress rahul gandhi demands that india must get free corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.