CoronaVirus: राहुल गांधींचा अमेठीवासीयांसाठी सॅनिटायझेशन ड्राइव्ह; पथकांची केली स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 09:44 PM2021-05-25T21:44:51+5:302021-05-25T21:48:24+5:30

CoronaVirus: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या अमेठीतील प्रत्येक घरे सॅनिटाइझ करण्याचा निर्णय घेतला आहे.

congress rahul gandhi forms teams for sanitize amethi homes | CoronaVirus: राहुल गांधींचा अमेठीवासीयांसाठी सॅनिटायझेशन ड्राइव्ह; पथकांची केली स्थापना

CoronaVirus: राहुल गांधींचा अमेठीवासीयांसाठी सॅनिटायझेशन ड्राइव्ह; पथकांची केली स्थापना

Next
ठळक मुद्देराहुल गांधींचा अमेठीवासियांसाठी सॅनिटायझर ड्राइव्हपथकांची केली स्थापना

अमेठी: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा इशारा आणि काळ्या बुरशीचा आजार यामुळे देशाच्या चिंतेत भर पडण्याची चिन्हे आहेत. उत्तर प्रदेशातही कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. मात्र, आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या अमेठीतील प्रत्येक घरे सॅनिटाइझ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. (congress rahul gandhi forms teams for sanitize amethi homes)

अमेठी हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला आहे. मात्र, सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचा याच अमेठीत पराभव झाला. भाजप नेत्या स्मृति इराणी यांनी राहुल गांधी यांना पराभूत करत विजय प्राप्त केला. मात्र, आता अमेठी जिल्ह्यातील नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे, यासाठी राहुल गांधी यांनी प्रत्येक घर सॅनिटाइझ करण्याचा निर्णय घेतल्याची महिती मिळाली आहे. यासाठी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. 

भाजपवाल्यांच्या घरात मुलांचे विवाह करणार नाही; शेतकऱ्यांचा निर्धार!

१० हजार लीटर सॅनिटाइझ

काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, अमेठीवासीयांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी राहुल गांधींकडून प्रत्येक घर सॅनिटाइझ करण्याचे ठरवण्यात आले आहे. यासाठी १० हजार लीटर सॅनिटाइझर लवकरच अमेठीत दाखल होणार आहे. या कामासाठी काही पथकांची स्थापना करण्यात आली आहे, असे सिंघल म्हणाले. 

५० टक्के लसीकरण पूर्ण झालं तरच लॉकडाऊन उठू शकतो, पण...; अस्लम शेख यांचे सूचक विधान

ऑक्सिजन कंस्ट्रेटरचीही मदत

सिंघल यांनी पुढे बोलताना सांगितले की, राहुल गांधी यांच्यावतीने २१ मे रोजी ५ ऑक्सिजन कंस्ट्रेटरची मदत करण्यात आली होती. तसेच २० ऑक्सिजन सिलेंडर पाठवण्यात आले होते. याशिवाय आणखी १५ ऑक्सिजन कंस्ट्रेटर अमेठीसाठी पाठवण्यात येत असल्याचे सिंघल म्हणाले. 
 

Web Title: congress rahul gandhi forms teams for sanitize amethi homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.