Rahul Gandhi : करवत आणि हातोडा... राहुल गांधींचा अनोखा अंदाज; फर्निचर मार्केटमध्ये कारागिरांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 05:39 PM2023-09-28T17:39:53+5:302023-09-28T17:51:43+5:30

Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीतील कीर्तीनगर येथील फर्निचर मार्केटला भेट दिली. यानंतर त्यांनी आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Congress Rahul Gandhi photos in kirti nagar furniture market | Rahul Gandhi : करवत आणि हातोडा... राहुल गांधींचा अनोखा अंदाज; फर्निचर मार्केटमध्ये कारागिरांची घेतली भेट

Rahul Gandhi : करवत आणि हातोडा... राहुल गांधींचा अनोखा अंदाज; फर्निचर मार्केटमध्ये कारागिरांची घेतली भेट

googlenewsNext

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीतील कीर्तीनगर येथील फर्निचर मार्केटला भेट दिली. यानंतर त्यांनी आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. "आज मी दिल्लीतील कीर्तीनगर येथे असलेल्या आशियातील सर्वात मोठ्या फर्निचर मार्केटमध्ये गेलो आणि सुतार बांधवांना भेटलो. कठोर परिश्रम करण्यासोबतच ते कमाल कलाकार देखील आहेत. मजबूत आणि सौंदर्य कोरीव काम करण्यात पारंगत आहेत."

"आम्ही खूप बोललो, त्याच्या कौशल्याबद्दल थोडं जाणून घेतले आणि थोडं शिकण्याचा प्रयत्न केला" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. काँग्रेसने देखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत. भारत जोडो यात्रा सुरू आहे, असंही पोस्टमध्ये म्हटलं आहे. राहुल गांधींच्या या फोटोची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. 

अलीकडच्या काळात राहुल गांधींची वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. भारत जोडो यात्रा सुरूच असल्याचे ते सांगतात. 21 सप्टेंबर रोजी राहुल गांधींनी दिल्लीतील आनंद विहार स्टेशनवर कुलींची भेट घेतली. छत्तीसगडला पोहोचल्यावर त्यांनी ट्रेनमधून प्रवास केला आणि याचदरम्यान त्यांची सर्वसामान्यांशी भेट झाली.

रमजान महिन्यात, 18 एप्रिल रोजी राहुल गांधींनी जुन्या दिल्लीतील मटिया महल मार्केटमध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला होता. मार्केटमध्येही गेला. प्रवासादरम्यान राहुल गांधींनी पाणीपुरी खाल्ली. दोन दिवसांनंतर, 20 एप्रिल रोजी राहुल गांधी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी मुखर्जी नगर, दिल्ली येथे पोहोचले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसले होते. 


 

Web Title: Congress Rahul Gandhi photos in kirti nagar furniture market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.