"जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है"; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 01:01 PM2021-05-15T13:01:11+5:302021-05-15T13:10:35+5:30

Congress Rahul Gandhi News : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर अप्रत्यक्षरित्या जोरदार टीका केली आहे.

Congress Rahul Gandhi Slams Modi Government over dead bodies found in ganga | "जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है"; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल

"जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है"; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल

Next

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून अनेक ठिकाणी प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे, काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोनाची देशातील स्थिती, लसीकरण, औषधं असा विविध मुद्द्यांवरून गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. कोरोना रुग्णांचे मृतदेह हे गंगा नदीमध्ये वाहत असलेले आढळून आले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता राहुल यांनी हल्लाबोल केला आहे. 

राहुल गांधी  (Congress Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर अप्रत्यक्षरित्या जोरदार टीका केली आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है" असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी गंगा घाटावर पूजा केली होती. त्यावेळेस त्यांनी माँ गंगेने बोलवलं असं म्हटलं होतं. यावरून आता सध्या परिस्थितीचं उदाहरण देत काँग्रेसने टोला लगावला आहे, राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये एका बातमीचा देखील फोटो शेअर केला आहे. 

"लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान सुद्धा गायब"

राहुल गांधी यांनी कोरोनावरील लसींचा तुटवडा आणि सेंट्रल विस्टा प्रकल्पावरून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. "लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान मोदी सुद्धा गायब" असल्याचं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. "लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान मोदी सुद्धा गायब आहेत. उरलं आहे तर फक्त सेंट्रल विस्टा, औषधांवर जीएसटी आणि जिथे तिथे पंतप्रधानांचे फोटो" असं म्हणत जोरदार टीका केली आहे. याआधी देखील राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात असल्याचं म्हणत मोदींना सल्ला दिला आहे. तसेच सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर कोरोना लस उपलब्ध करून देण्याची विनंती देखील राहुल गांधींनी पंतप्रधानांना केली आहे. कोरोना व्हायरसच्या सर्व स्वरुपाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करण्यासोबतच संपूर्ण जगाला याबद्दल माहिती देण्याचा आग्रह राहुल गांधी यांनी या पत्राद्वारे केला आहे. केंद्र सरकारच्या अपयशामुळे देश पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तराच्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे असा गंभीर आरोपही राहुल यांनी आपल्या पत्रातून केला आहे. अशावेळी गेल्या वर्षीसारखं गरिबांना कठीण प्रसंगाचा सामना करावा लागू नये यासाठी तातडीने आर्थिक मदत पोहचवण्यात यावी असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

 

Web Title: Congress Rahul Gandhi Slams Modi Government over dead bodies found in ganga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.