"मोदी सरकार आयकर विभाग, ED आणि CBI ला आपल्या बोटांवर नाचवतं", राहुल गांधींचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 05:29 PM2021-03-04T17:29:21+5:302021-03-04T17:31:54+5:30
Rahul Gandhi And Modi Government : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली - दिग्दर्शक अनुराग कश्यप, विकास बेहेल आणि अभिनेत्री तापसी पन्नूच्या घरावर आणि मालमत्तांवर प्राप्तिकर विभागानं छापे टाकले आहेत. ही कारवाई फँटम फिल्म्सशी संबंधित असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुंबई आणि पुण्यातल्या अनेक ठिकाणी प्राप्तिकर विभागाची पथकं छापे टाकत आहेत. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. म्हणींचा वापर करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
राहुल गांधी यांनी आयकर विभाग (Income Tax Department), सक्तवसुली संचालनालय (ED) आणि केंद्रीय तपास यंत्रणा (CBI) याबाबत ‘उंगलियों पर नचाना’ या म्हणीचा वापर करत केंद्र सरकार यांना आपल्या बोटांवर नाचवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी माध्यमांबाबतही एक म्हण लिहिली आहे. माध्यमं ही पंतप्रधान मोदी यांचे मित्र असल्याचं म्हटलं आहे. तसेच 'खिसियानी बिल्ली खंबा नोचे' या म्हणीचा वापर करुन सरकार शेतकरी नेते आणि त्यांच्या समर्थकांवर छापे टाकत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
कुछ मुहावरे:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 4, 2021
उँगलियों पर नचाना- केंद्र सरकार IT Dept-ED-CBI के साथ ये करती है।
भीगी बिल्ली बनना- केंद्र सरकार के सामने मित्र मीडिया।
खिसियानी बिल्ली खंबा नोचे- जैसे केंद्र सरकार किसान-समर्थकों पर रेड कराती है।#ModiRaidsProFarmers
राहुल गांधी यांनी सिलिंडरच्या वाढत्या दरावरून निशाणा साधला आहे. "एलपीजी सिलिंडरचे दर पुन्हा एकदा वाढले, जनतेसाठी मोदी सरकारचे पर्याय – व्यवसाय बंद करा, चूल फूका, खोटी आश्वासनं खा" असं ट्विट करत राहुल गांधी केलं असून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात 100 रूपयांची वाढ झाली होतीय यापूर्वी 25 फेब्रुवारी रोजी गॅसचे दर 25 रूपयांनी वाढले होते. त्यापूर्वी 4 फेब्रुवारी रोजी 25 रूपये, त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी 50 रूपयांची वाढ करण्यात आली होती.
प्रकाश राज यांची मोदी सरकारवर बोचरी टीका, म्हणाले...https://t.co/sRpyBtXPMH#PrakashRaj#ModiGovt#NarendraModi#CylinderRatepic.twitter.com/XPkqjQIKV7
— Lokmat (@MiLOKMAT) March 4, 2021
"मोदींना घाबरत नाही म्हणून मला 30 सेकंदात झोप लागते मात्र..."; राहुल गांधींची बोचरी टीका
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या (Tamilnadu Election 2021) तारखेची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या राहुल गांधी तामिळनाडूमध्ये असून त्यांनी तेथील मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. "मला रात्री फक्त 30 सेकंदांमध्ये झोप लागते. कारण मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही. मोदींना वाटतं की ते तामिळनाडूच्या लोकांना कंट्रोल करू शकतात. मात्र आता हेच नागरिक या रिमोटमधील बॅटरी काढून ती फेकून देणार आहेत" असं म्हणत राहुल यांनी हल्लाबोल केला आहे.
"मोदींना वाटतं तामिळनाडूच्या लोकांना कंट्रोल करू. मात्र आता हेच लोक रिमोटमधील बॅटरी काढून ती फेकून देणार", राहुल गांधींची बोचरी टीकाhttps://t.co/TdA3lQylTr#Congress#RahulGandhi#BJP#NarendraModi#tamilnaduassemblyelection2021#TamilNadupic.twitter.com/blOcsqLDQF
— Lokmat (@MiLOKMAT) February 28, 2021