Corona Vaccination : "केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 12:18 PM2021-04-21T12:18:33+5:302021-04-21T12:29:56+5:30
Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over Corona Vaccination : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत 2,95,041 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 82 हजारांवर पोहोचला आहे.कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना लसीकरणही वेगाने सुरू आहे. याच दरम्यान आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोना लसीकरणावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
"केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही... शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार" असं म्हणत राहुल यांनी टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही. सर्वसामान्य माणूस रांगा लावणार. संपत्ती, आरोग्य आणि आपला जीव गमावणार. आणि शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
केंद्र सरकार की वैक्सीन रणनीति नोटबंदी से कम नहीं-
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 21, 2021
* आम जन लाइनों में लगेंगे
* धन, स्वास्थ्य व जान का नुक़सान झेलेंगे
* और अंत में सिर्फ़ कुछ उद्योगपतियों का फ़ायदा होगा।
"केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची भयंकर अशी दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतत आहेत. सर्वसामान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील अत्यंत आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अॅलर्जी आहे" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. तसेच "वाढत्या कोरोना संकटात लसींची कमतरता एक अतिगंभीर समस्या आहे, 'उत्सव' नाही. आपल्या देशवासियांना संकटात टाकून लसींची निर्यात योग्य आहे का? केंद्र सरकारने पक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना मदत करावी. आपल्या सर्वांना मिळून या महामारीला हरवायचं आहे" असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं होतं.
CoronaVirus News : "राहुल गांधी हे कोरोना लढाईत सरकारपेक्षा शंभर पावले पुढे"https://t.co/bt6ngEHlVo#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#Shivsena#modigovernment#Politics#BJP#Election2021#RahulGandhipic.twitter.com/yihrNMwJ5R
— Lokmat (@MiLOKMAT) April 17, 2021
"आवश्यकता असलेल्या प्रत्येकाला लसीकरण झाले पाहिजे आणि तत्काळ लसींच्या निर्यातीवर बंदी आणली गेली पाहिजे. तसेच लसी जलगतीने उपलब्ध व्हायला हव्यात. देश या क्षणी महामारीच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे. आपल्या शास्त्रज्ञ व डॉक्टरांनी मिळून देशातील कोरोनाचं संकट नष्ट करण्यासाठी मोठ्या कष्टाने लस तयार केली. मात्र सरकारने लसीकरण कार्यक्रमाची योग्यप्रकारे अंमलबजावणी केली नाही. देशात एवढ्या हळूवारपणे लसीकरण सुरू आहे की, 75 टक्के लोकांना लस देण्यासाठी वर्षांचा कालावधी लागेल" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
CoronaVirus Mumbai Updates : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; चिंता वाढवणारी आकडेवारीhttps://t.co/jaVx6erImA#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) April 21, 2021
CoronaVirus Vaccine : "कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी, रेमडेसिवीर मिळू नये आणि इथली स्थिती बिघडावी असा केंद्राचा प्रयत्न आहे का?"https://t.co/sxCwGplqPR#coronainmaharashtra#MaharashtraFightsCorona#coronavaccination#BJP#NanaPatole#ModiGovt@NANA_PATOLEpic.twitter.com/h39eNkGJAS
— Lokmat (@MiLOKMAT) April 20, 2021