Hathras Gangrape : "उत्तर प्रदेशच्या 'वर्ग-विशेष' जंगलराजने आणखी एका तरुणीला मारलं", राहुल गांधींचा हल्लाबोल
By सायली शिर्के | Published: September 29, 2020 07:19 PM2020-09-29T19:19:18+5:302020-09-29T19:32:50+5:30
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये 15 दिवसांपूर्वी एका 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी तरुणीची जीभ देखील कापली. गंभीर अवस्थेत असलेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र मंगळवारी सकाळी पीडितीचे मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे.
"उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारून टाकलं" असं म्हणत राहुल गांधींनी जोरदार टीका केली आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "सरकारने म्हटलं की फेक न्यूज आहे आणि पीडितेस मरण्यासाठी सोडून दिलं. मात्र ही दुर्देवी घटना खोटी नव्हती, पीडितेचा मृत्यूही आणि सरकारचा निर्दयीपणा देखील खोटा नव्हता" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच प्रियंका गांधी यांनी देखील योगी सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमधील कायदे व्यवस्था बिघडल्याचं म्हटलं आहे.
UP के ‘वर्ग-विशेष’ जंगलराज ने एक और युवती को मार डाला।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 29, 2020
सरकार ने कहा कि ये फ़ेक न्यूज़ है और पीड़िता को मरने के लिए छोड़ दिया।
ना तो ये दुर्भाग्यपूर्ण घटना फ़ेक थी, ना ही पीड़िता की मौत और ना ही सरकार की बेरहमी। pic.twitter.com/0Ew5BoIVQK
क्रूरतेचा कळस! तरुणीवर सामूहिक बलात्कार; कापली जीभ
हाथरसच्या चंदपा परिसरातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली होती. गावातील चार तरुणांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींनी तरुणीला मारहाण केली आणि तिची जीभ कापली. तिची गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्नही केला. यामध्ये तिला गंभीररित्या दुखापत झाली असून अलीगढच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. तरुणीने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणालाही सांगून नये म्हणून तिची जीभ कापण्यात आली होती.
केवळ इशारा करुन घडलेल्या दुष्कर्माची दिली होती माहिती
14 सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर 19 सप्टेंबरला जेव्हा पीडितेचे म्हणणे नोंदवण्यासाठी पोलीस आले, तेव्हा ती बेशुद्ध झाली होती आणि तिला आपल्यासोबत घडलेल्या दुष्कर्माची माहिती सांगता आली नाही. 22 सप्टेंबरला पुन्हा पोलीस जेएन मेडिकल कॉलेजमध्ये हॅले आणि जबाब नोंदवला. त्यावेळी तिने केवळ इशारा करुन घडलेल्या दुष्कर्माची माहिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आणि तुरूंगात पाठविले. जबाब घेणाऱ्याने/सीओने त्यांच्या उच्च अधिकऱ्यांना पाठवलेल्या दोन पानांच्या अहवालात ही माहिती दिली आहे.
"शेतकऱ्यांचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेरही चिरडला जातोय"https://t.co/tBr37tqWbO#RahulGandhi#Congress#ModiGovernment#FarmersBill#Farmers#AgricultureBillpic.twitter.com/ephiFKCyEI
— Lokmat (@MiLOKMAT) September 28, 2020
राहुल गांधींची शेतकऱ्यांशी 'दिल की बात'https://t.co/QUUQOErxWH#RahulGandhi#Congress#ModiGovt#Farmers#agriculture@INCIndiapic.twitter.com/G0sHfrIUFq
— Lokmat (@MiLOKMAT) September 29, 2020