"4 महिन्यांत गेल्या 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 02:46 PM2020-08-19T14:46:37+5:302020-08-19T15:58:47+5:30

काँग्रेसचे नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ते मोदींवर सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत.

congress rahul gandhi targeted modi government now can not hide the truth of economy | "4 महिन्यांत गेल्या 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात"

"4 महिन्यांत गेल्या 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात"

googlenewsNext

नवी दिल्ली- कोरोना, लॉकडाऊन, भारत आणि चीनमध्ये असलेला तणाव अशा विविध मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ते मोदींवर सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे अनेकाच्या नोकऱ्या केल्या आहेत. मोठ्या संख्येने लोक बेरोजगार झाले आहेत. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

राहुल गांधी यांनी "4 महिन्यांत गेल्या 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात" असल्याचं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "गेल्या 4 महिन्यांत जवळपास 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात आहे. फेसबुकवर खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवून बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेच्या सर्वनाशाचे सत्य देशापासून लपवता येत नाही" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी बुधवारी (19 ऑगस्ट) याबाबतचे एक ट्विट केलं आहे. तसेच यासोबतच एक बातमीही पोस्ट केली आहे. बातमीत एप्रिल 2020 पासून ते आतापर्यंत 1 कोटी 89 लाख नोकऱ्या गेल्याचा दावा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राहुल यांनी  "नोकरी हिसकावली, जमवलेले पैसेही हडपले, आजाराचा संसर्ग रोखू शकले नाही मात्र ते जनतेला खोटी स्वप्न दाखवत राहिले" असं ट्विट केलं होतं. राहुल गांधी यांनी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन मसुद्यावरून (EIA2020) देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. 

EIA2020 उद्देशच देशाला लुटण्याचा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. देशाची साधनसंपत्ती लुटणाऱ्या मित्रांसाठी भाजपा काय करत आली याचं आणखी एक भयंकर उदाहरण असं देखील त्यांनी याआधी म्हटलं होतं. तसेच राहुल गांधी यांनी यासोबतच LootOfTheNation हा हॅशटॅग देखील वापरला आहे. याआधी कागदपत्र हरवल्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले होतं. जेव्हा जेव्हा देश भावूक झाला. त्याचवेळी फाईल्स गायब झाल्या आहेत असा टोला राहुल यांनी मोदी सरकारला लगावला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! पंतप्रधान मोदींना 18 पानांचं पत्र लिहून मुलीची आत्महत्या

VIDEO: ...अन् बिहारच्या डीजीपींनी थेट रिया चक्रवर्तीची 'औकात' काढली; ऐका काय म्हणाले

बापरे! आग्र्यामध्ये प्रवाशांनी भरलेली बस हायजॅक, परिसरात खळबळ

CoronaVirus News : हादरवणारी आकडेवारी! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; 27 लाखांचा टप्पा केला पार

CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये पुन्हा दिसताहेत लक्षणं, वेळीच व्हा सावध

"...तर पंजाब पेटून उठेल", मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला गंभीर इशारा

CoronaVirus News : तंत्रज्ञानाची कमाल! आता चेहऱ्यावर मशीन लावणार मास्क, Video तुफान व्हायरल

Web Title: congress rahul gandhi targeted modi government now can not hide the truth of economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.