Farmers Protest: शेती आणि देशाच्या रक्षणासाठी शेतकरी मरतायत; ५०० जणांच्या मृत्यूवरून राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 05:30 PM2021-06-09T17:30:22+5:302021-06-09T17:31:07+5:30

Farmers Protest: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवत एक ट्विट करत टीका केली आहे.

congress rahul gandhi tweet for farmers protest against farm laws | Farmers Protest: शेती आणि देशाच्या रक्षणासाठी शेतकरी मरतायत; ५०० जणांच्या मृत्यूवरून राहुल गांधींची टीका

Farmers Protest: शेती आणि देशाच्या रक्षणासाठी शेतकरी मरतायत; ५०० जणांच्या मृत्यूवरून राहुल गांधींची टीका

Next

नवी दिल्ली: केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. भारतीय किसान युनियनचे नेते आणि प्रवक्ते राकेश टिकैत या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. या गेल्या सहा महिन्यांच्या काळात शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी ५०० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवत एक ट्विट करत टीका केली आहे. (congress rahul gandhi tweet for farmers protest against farm laws) 

नव्या वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या असल्या तरीही यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मात्र, तरीही शेतकरी मागे हटण्यास तयार नाही. या कालावधीत तब्बल ५०० शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासंदर्भात किसान एकता मोर्चाच्या वतीने ट्विट करण्यात आले असून, मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करत ट्विट केले आहे. 

बाबा रामदेव यांना धक्का! भूताननंतर नेपाळमध्ये कोरोनिलवर बंदी; नेमकं कारण काय?

शेती आणि देशाच्या रक्षणासाठी शेतकरी मरतायत

शेतकरी आपली शेती व देशाच्या रक्षणासाठी शेतकरी मरत आहेत. पण ते घाबरलेले नाहीत नाहीत आणि आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच यासोबत #500DeathsAtFarmersProtest हा हॅशटॅगही दिला आहे. जोपर्यंत विजय होत नाही तोवर आम्ही आंदोलन करणार असल्याचे किसान एकता मोर्चाने स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, २६ नोव्हेंबर २०२० रोजी शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात आवाज उठवत आंदोनालास सुरुवात केली. कोरोनासह अन्य कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता आंदोलन सुरूच ठेवले. यात काही शेतकऱ्यांना आपला जीवही गमवावा लागला आहे. दुसरीकडे हे आंदोलन नेमके कधीपर्यंत चालणार हेदेखील अस्पष्ट आहे. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आंदोलन प्रभावित झाले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून, आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी राकेश टिकैत यांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. यापूर्वीच ममता बॅनर्जी यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. 
 

Web Title: congress rahul gandhi tweet for farmers protest against farm laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.