"जनतेसाठी मोदी सरकारचे पर्याय - व्यवसाय बंद करा, चूल फूका, खोटी आश्वासनं खा"; राहुल गांधींचं टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 02:25 PM2021-03-01T14:25:18+5:302021-03-01T14:33:45+5:30
Congress Rahul Gandhi And Narendra Modi : पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. चार दिवसांमध्ये सरकारी कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात पुम्हा एकदा वाढ केली आहे.
नवी दिल्ली - देशात गेल्या कित्येक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर मोठ्या प्रमाणात ताण पडतोय. असं असलं तरी दुसरीकडे पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. चार दिवसांमध्ये सरकारी कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात पुम्हा एकदा वाढ केली आहे. महिन्याभराच्या कालावधीत सिलिंडरच्या दरात झालेली ही चौथी वाढ आहे. आज (1 मार्च) सिलिंडरच्या दरात 25 रूपयांची वाढ झाली आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. सिलिंडरच्या वाढत्या दरावरून निशाणा साधला आहे. "एलपीजी सिलिंडरचे दर पुन्हा एकदा वाढले, जनतेसाठी मोदी सरकारचे पर्याय – व्यवसाय बंद करा, चूल फूका, खोटी आश्वासनं खा" असं ट्विट करत राहुल गांधी केलं असून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात 100 रूपयांची वाढ झाली होतीय यापूर्वी 25 फेब्रुवारी रोजी गॅसचे दर 25 रूपयांनी वाढले होते. त्यापूर्वी 4 फेब्रुवारी रोजी 25 रूपये, त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी 50 रूपयांची वाढ करण्यात आली होती.
LPG सिलेंडर के दाम फिर बढ़ गए।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 1, 2021
जनता के लिए मोदी सरकार के विकल्प-
- व्यवसाय बंद कर दो
- चूल्हा फूँको
- जुमले खाओ!
चार दिवसांत पुन्हा गॅस सिलिंडरची दरवाढ, पाहा काय आहेत नवे दर
देशात पुन्हा एकदा विनाअनुदानीत सिलिंडरच्या दरात 25 रूपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर दिल्लीत आता घरगुती गॅसचे दर 794 रूपयांवरून वाढून 819 रूपये इतके झाले आहेत. तर मुंबईत सिलिंडरचे नवे दर 819 रूपये, कोलकात्यात 845.50 रूपये आणि चेन्नईमध्ये नवे दर आता 835 रूपये झाले आहेत. जानेवारी महिन्यात कंपन्यांनी या दरात कोणतेही बदल केले नवते परंतु फेब्रुवारी महिन्यात सलग तीनदा हे दर वाढवण्यात आले. गॅसचे नवे दर पाहण्यासाठी तुम्हाला सरकारी इंधन कंपन्यांच्या संकेतस्थळावरही माहिती मिळू शकते. या ठिकाणी इंधन कंपन्या दर महिन्याला नवे दर जारी करत असते. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या संकेतस्थळावर जाऊनही तुम्हाला गॅस सिलिंडरचे नवे दर पाहता येऊ शकतात.
"मोदींना वाटतं तामिळनाडूच्या लोकांना कंट्रोल करू. मात्र आता हेच लोक रिमोटमधील बॅटरी काढून ती फेकून देणार", राहुल गांधींची बोचरी टीकाhttps://t.co/TdA3lQylTr#Congress#RahulGandhi#BJP#NarendraModi#tamilnaduassemblyelection2021#TamilNadupic.twitter.com/blOcsqLDQF
— Lokmat (@MiLOKMAT) February 28, 2021
"मोदींना घाबरत नाही म्हणून मला 30 सेकंदात झोप लागते मात्र..."; राहुल गांधींची बोचरी टीका
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या (Tamilnadu Election 2021) तारखेची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या राहुल गांधी तामिळनाडूमध्ये असून त्यांनी तेथील मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. "मला रात्री फक्त 30 सेकंदांमध्ये झोप लागते. कारण मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही. मोदींना वाटतं की ते तामिळनाडूच्या लोकांना कंट्रोल करू शकतात. मात्र आता हेच नागरिक या रिमोटमधील बॅटरी काढून ती फेकून देणार आहेत" असं म्हणत राहुल यांनी हल्लाबोल केला आहे.
"मला रात्री फक्त 30 सेकंदांमध्ये झोप लागते. कारण मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना घाबरत नाही. मात्र तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना झोप लागायला किती वेळ लागत असेल? त्यांना रात्री झोपच लागत नसेल, कारण ते प्रामाणिक नाहीत. ते प्रामाणिक नसल्यामुळेच मोदींच्या विरोधात उभे राहू शकत नाहीत. तसेच जे असा विचार करतात की आपण तामिळनाडूच्या लोकांना हवं तसं हाताळू शकतो कारण तिथला मुख्यमंत्री भ्रष्टाचारी आहे" असं म्हणत राहुल गांधींनी मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
"केंद्र सरकार काही गोष्टी होऊ देत नाहीत किंवा जे करणं आवश्यक आहे, ते न्यायपालिकेला करू देत नाही"https://t.co/5UioXz6IKc#RahulGandhi#Congress#NarendraModi#BJPpic.twitter.com/ow1oadIOab
— Lokmat (@MiLOKMAT) February 23, 2021