गॅस सिलिंडर घेऊन बसलेल्या स्मृती इराणींचा फोटो ट्विट करून राहुल गांधी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 04:13 PM2020-02-13T16:13:09+5:302020-02-13T16:23:30+5:30

इंडियन ऑईलने गॅस सिलिंडरच्या किंमतीत जवळपास 150 रुपयांची वाढ केली आहे.

congress rahul gandhi tweet union minister smriti irani protesting picture bjp cylinder price hike delhi | गॅस सिलिंडर घेऊन बसलेल्या स्मृती इराणींचा फोटो ट्विट करून राहुल गांधी म्हणाले...

गॅस सिलिंडर घेऊन बसलेल्या स्मृती इराणींचा फोटो ट्विट करून राहुल गांधी म्हणाले...

Next

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवानंतर विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्रातील सत्ताधारी भाजपावर काँग्रेसने हल्लाबोल सुरु केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत भाजपावर निशाणा साधला आहे.      

राहुल गांधी यांनी स्मृती इराणी यांचा जुना फोटो ट्विट केला आहे. यामध्ये स्मृती इराणी आणि भाजपाचे कार्यकर्ते गॅस सिलिंडर घेऊन आंदोलन करताना दिसत आहेत. या फोटोसह राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "एलपीजी सिलिंडरच्या दरात 150 रुपयांची वाढ केल्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या या सदस्यांसोबत मी सहमत आहे."

ज्यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएचे सरकार होते, तेंव्हाचा हा स्मृती इराणी यांचा फोटो आहे. यूपीए सरकारच्या कार्यकाळात गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यावेळी भाजपाने जोरदार आंदोलन केले होते. स्मृती इराणी गॅस सिलिंडर घेऊन भाजपा कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरल्या होत्या. 

बुधवारी इंडेन गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईलने गॅस सिलिंडरच्या किंमतीत जवळपास 150 रुपयांची वाढ केली आहे. विना अनुदानित 14 किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत 144.50 रुपयांपासून 149 रुपयांपर्यंत वाढ जाहीर करण्यात आली आहे. याआधी 1 जानेवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प  मांडण्यापूर्वी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या होत्या. दरम्यान, राहुल गांधी यांनी गॅस सिलिंडरच्या किंमती कमी करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडे केली  आहे.

Web Title: congress rahul gandhi tweet union minister smriti irani protesting picture bjp cylinder price hike delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.