सरकारी शिक्षणाच्या खर्चात गुजरात देशात 26व्या स्थानावर का?, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 10:03 AM2017-12-02T10:03:07+5:302017-12-02T10:13:35+5:30

'22 वर्षांचा हिशोब द्या, जनतेला उत्तर द्या', असे ट्विट करुन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींकडून दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले जात आहेत.

congress vp rahul gandhi slams pm narendra modi | सरकारी शिक्षणाच्या खर्चात गुजरात देशात 26व्या स्थानावर का?, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल

सरकारी शिक्षणाच्या खर्चात गुजरात देशात 26व्या स्थानावर का?, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल

Next

नवी दिल्ली - '22 वर्षांचा हिशोब द्या, जनतेला उत्तर द्या', असे ट्विट करुन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींकडून दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले जात आहेत. शनिवारी राहुल गांधी यांनी गुजरातमधील सरकारी शाळा व कॉलेजसंबंधी टीका करत मोदींना प्रश्न विचारला आहे. 
 
''22 सालों का हिसाब
#गुजरात_मांगे_जवाब
प्रधानमंत्रीजी- चौथा सवाल
सरकारी स्कूल-कॉलेज की कीमत पर  
किया शिक्षा का व्यापार
महँगी फ़ीस से पड़ी हर छात्र पर मार
New India का सपना कैसे होगा साकार?
सरकारी शिक्षा पर खर्च में गुजरात देश में 26वें स्थान पर क्यों? युवाओं ने क्या गलती की है?'', असा प्रश्न राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे.  सरकारी शिक्षण संस्थांवर होणा-या खर्चा गुजरात देशात 26 व्या स्थानावर का आहे, असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.



 

यापूर्वी, राहुल गांधी यांनी, सरकारी वीज निर्मिती प्रकल्पांमधील निर्मिती कमी करुन 4 खासगी कंपन्यांचे खिसे का भरले?, असा सवाल विचारला होता. जनतेच्या पैशांची मोदींनी लूट का केली?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी दररोज पंतप्रधान मोदींना गुजरातमधील परिस्थितीबद्दल प्रश्न विचारत आहेत.

‘2002-16 या काळात 62 हजार 549 कोटी रुपयांची वीज खरेदी करुन 4 खासगी कंपन्यांचे खिसे का भरण्यात आले? सरकारकडून केली जाणारी वीज निर्मिती क्षमता 62 टक्क्यांनी कमी करुन 3 रुपये प्रति युनिट दराने मिळणारी वीज खासगी कंपन्यांकडून 24 रुपये दराने का खरेदी करण्यात आली?,’ असे प्रश्न राहुल गांधींनी ट्विटरवरुन विचारले आहेत. जनतेच्या कमाईची लूट का करण्यात आली? असा सवालदेखील राहुल गांधींनी या ट्विटमधून उपस्थित केला. राहुल गांधी 29 नोव्हेंबरपासून दररोज मोदींना एक प्रश्न विचारत आहेत. राहुल यांनी मोदींना सर्वप्रथम घरांच्या आश्वासनाबद्दल प्रश्न विचारला होता.  
 

Web Title: congress vp rahul gandhi slams pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.