आगामी निवडणुकांत काँग्रेस मुसंडी मारेल - सोनिया गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 06:23 AM2018-02-09T06:23:36+5:302018-02-09T06:23:58+5:30

भाजपाला येत्या निवडणुकांत पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत लवकरच धोरण निश्चित केले जाईल, असे सांगतानाच आगामी निवडणुकांत काँग्रेस आणि समविचारी पक्ष मिळूनच विजयी होतील, असा दावा यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी गुरुवारी केला.

Congress will puff up in upcoming elections - Sonia Gandhi | आगामी निवडणुकांत काँग्रेस मुसंडी मारेल - सोनिया गांधी

आगामी निवडणुकांत काँग्रेस मुसंडी मारेल - सोनिया गांधी

Next

- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : भाजपाला येत्या निवडणुकांत पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत लवकरच धोरण निश्चित केले जाईल, असे सांगतानाच आगामी निवडणुकांत काँग्रेस आणि समविचारी पक्ष मिळूनच विजयी होतील, असा दावा यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी गुरुवारी केला. गुजरात व राजस्थानमधील निवडणुकांतून काँग्रेसकडे लोक वळू लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही त्या म्हणाल्या.
गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने लोकशाहीचे आधारस्तंभ असलेल्या संस्थाच नष्ट करण्याचे काम केले, असा आरोप करून सोनिया गांधी म्हणाल्या, संसद, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे यांच्यावरील हल्ले ही त्याची उदाहरणेच आहेत.
आपल्या राजकीय विरोधकांच्या मागे तपास यंत्रणांचे शुक्लकाष्ट लावणे, त्यांना धमकावणे व आपल्या विरोधकांचा आवाज बंद करू पाहणे, हेच काम मोदी सरकार करीत आहे. धर्मनिरपेक्षा व लोकशाही यांचा गळा घोटण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न देशात सुरू आहे. शेकडो वर्षांपासूनचे आपले विविधतेत एकता हे वैशिष्ट्य व ताकद कमजोर केली जात आहे, असेही त्या म्हणाल्या.
मोदी सरकार आर्थिक, कृषीविकास तसेच उद्योग व रोजगार यांबाबत
मोठमोठी आश्वासने देते. पण प्रत्यक्षात परिस्थिती विपरीत आहे. शेतकरी
आत्महत्या करीत आहेत, ग्रामीण
अर्थव्यवस्था, लघू व मध्यम उद्योग अडचणीत आहेत, बेरोजगारी वाढत चालली आहे. नव्या नोकºया तर सोडाच, पण असलेल्यांचा रोजगारही जात आहे, काश्मीर जळत आहे, उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये दलितांवर हल्ले वाढत आहेत. पण सरकार गप्प बसून आहे, अशी टीका करून त्या म्हणाल्या की, त्यासाठी कोणाची साक्ष काढण्याची गरजच नाही. संसदेत पंतप्रधानांनी केलेले भाषणच त्याचे उदाहरण आहे.
राष्टÑवादीला सोबत घेऊ
येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम्ही राष्टÑवादीला सोबत घेऊ, शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि राष्टÑीय नेत्याला वगळून चालणार नाही. मात्र, कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालीच या निवडणुका लढविल्या जातील, अशी माहिती काँग्रेसचे नेते मोतीलाल व्होरा यांनी दिली. महाराष्टÑात भाजपा-शिवसेना सरकारविरोधी वातावरण आहे. स्वबळावर लढण्यासाठी कॉँग्रेससाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे. त्यासाठी महाराष्टÑातील कॉँग्रेसच्या नेत्यांनी अंतर्गत राजकारण विसरत सरकारच्या उणिवा आणि प्रश्न घेऊन एकजुटीने लोकांपर्यंत गेले पाहिजे.
नेत्यांच्या एकजुटीचे पक्षपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राष्टÑवादीलाही
कॉँग्रेसची गरज आहे. शरद पवार हे
ज्येष्ठ नेते व आमचे जुने सहकारी
आहेत त्यामुळे राष्टÑवादीसोबत आघाडी होईलच, असे खा. मोतीलाल व्होरा
यांनी सांगितले.
>राहुल माझेही बॉस
राहुल गांधी हेच आता आपले बॉस आहेत, असे सांगून सोनिया गांधी म्हणाल्या की, राहुल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केवळ काँग्रेसच मजबूत करू असे नव्हेतर, धर्मनिरपेक्ष मूल्यांचे रक्षणही करू.
>कार्यकर्त्यांनी तयार राहावे
आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी पक्षाच्या खासदारांनी जनतेत जावे, त्यांच्याशी थेट संवाद साधावा, मोदी सरकारने आश्वासनांना कसा हरताळ फासला ते त्यांना सांगावे, असे सांगतानाच पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही गावागावांत, गल्लीबोळात जाऊ न काँग्रेसविषयी सकारात्मक वातावरण तयार करावे आणि लोकांच्या समस्या समजून घ्याव्यात, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.

Web Title: Congress will puff up in upcoming elections - Sonia Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.