महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 06:46 PM2024-11-12T18:46:04+5:302024-11-12T18:46:57+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: यात, राहुल गांधी यांच्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात 6 सभा होणार आहेत. प्रियांका गांधी बुधवारपासून महाराष्ट्रात चार सभा घेणार आहेत. तर काँग्रेसाध्यक्ष खर्गे दहा सभा घेणार आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर काँग्रेसचे विशेष लक्ष असेल.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष संपूर्ण ताकदीनिशी आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. यात आता, निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या ६ दिवसांत काँग्रेस आपली संपूर्ण ताकद लावणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, येत्या सहा दिवसांत कांग्रेसचे राष्ट्रीय आणि राज्यातील बडे नेते सुमारे नव्वद सभा घेणार आहेत. यांपैकी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियांका गांधी यांच्या सुमारे 20 सभा होणार आहेत.
यात, राहुल गांधी यांच्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात 6 सभा होणार आहेत. प्रियांका गांधी बुधवारपासून महाराष्ट्रात चार सभा घेणार आहेत. तर काँग्रेसाध्यक्ष खर्गे दहा सभा घेणार आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर काँग्रेसचे विशेष लक्ष असेल.
पटोले यांच्या २० तर इम्रान प्रतापगढी यांच्या वीसहून अधिक सभा? -
काँग्रेसच्या स्टार प्रचारकांपैकी इम्रान प्रतापगढी यांच्या वीसहून अधिक, सचिन पायलट यांच्या सुमारे आठ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले २० तर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात १५ सभा घेणार आहेत. याशिवाय, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील प्रचारात दिसणार आहेत. महत्वाचे म्हणजे, १७ नोव्हेंबरला मुंबईत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांची संयुक्त सभाही होऊ शकते.
गॅरंटी कार्ड ५ कोटी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष -
काँग्रेसने महा विकास अघाडीने दिलेल्या पाच मोठ्या आश्वासनांचे गॅरंटी कार्ड ५ कोटी घरांपर्यंत पोचवण्याचे टरवले आहे. यासाठी डोर टू डोर अभियान चलवले जात आहे.
महाविकास आघाडीच्या ५ गॅरेंटी -
- महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.
- शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन.
- जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.
- २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे.
- बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत.