Corona Vaccination: अशी ही बनवाबनवी! सर्वाधिक लसीकरणाच्या विक्रमामागे मोदी सरकारचं 'हे' गुढ रहस्य; खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 04:07 PM2021-06-23T16:07:28+5:302021-06-23T16:09:13+5:30
'मोदी है तो मुमकीन है' या वाक्याऐवजी आता 'मोदी है, तो चमत्कार है' असं वाचायला हवं असा टोला पी. चिंदबरम यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
नवी दिल्ली – देशात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी एकाच दिवसात तब्बल ८८ लाख लोकांचे लसीकरण झाल्याचा विक्रम नोंदवण्यात आला होता. मात्र या विक्रमावर काँग्रेस नेता आणि माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रविवारी लसीचा साठा केला, सोमवारी लसीकरण केले अन् त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी जैसे थे स्थिती झाली असा दावा पी. चिंदबरम यांनी केला आहे. चिंदबरम यांनी केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मोदी है तो मुमकीन है
पी. चिंदबरम(P Chidambaram) यांनी ट्विट करून म्हटलं की, रविवारी लसींचा साठा करण्यात आला. सोमवारी लोकांचे लसीकरण झाले आणि मंगळवारी पुन्हा पहिल्यासारखीच परिस्थिती उद्भवली. एका दिवसात लसीकरण करण्याचा विक्रम करण्यामागे हेच गुढ रहस्य आहे. मला विश्वास आहे केंद्राच्या या करकुतीला गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये जागा मिळाली आहे. पुढच्या ट्विटमध्ये ते सांगतात की, कोणाला ठाऊक, पण मेडिसिनचा नोबेल पुरस्कार मोदी सरकारलाही दिला जाऊ शकतो. मोदी है तो मुमकीन है या वाक्याऐवजी आता मोदी है, तो चमत्कार है असं वाचायला हवं असा टोला चिंदबरम यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
रविवार को जमाखोरी, सोमवार को टीका लगाएं और मंगलवार को लंगड़ाकर वापस लौट जाएं। "एक दिन" के टीकाकरण के विश्व "रिकॉर्ड" के पीछे यही रहस्य है।
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) June 22, 2021
मुझे यकीन है कि इस "करतब" को गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड्स में जगह मिलेगी!
जागतिक विक्रमानंतर आता लसीकरण धीम्यागतीनं
देशात या वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचं लक्ष्य केंद्र सरकारने आखलं आहे. सोमवारी ८८ लाख लोकांचे लसीकरण केल्यानंतर फुगा फुटला. मंगळवारी रात्री १० पर्यंत आकड्यांनुसार देशात ५३ लाख ८६ हजार लोकांचे लसीकरण झाले. त्याच्या एक दिवस आधी सोमवारी जेव्हा लसीकरणाची सुरूवात झाली तेव्हा ८८ लाख लोकांचे लसीकरण झाले होते. मंगळवारी सर्वाधिक ७ लाख ९६ हजार लोकांचे लसीकरण उत्तर प्रदेशात करण्यात आले. परंतु मध्य प्रदेशातील आकडा विचार करण्यासारखा होता. जिथे सोमवारी रेकॉर्डनुसार १६ लाख ९५ हजार लसीकरण झालं तिथं मंगळवारी फक्त ४ हजार ८२५ जणांना लस देण्यात आली.
कौन जाने, हो सकता है मेडिसिन का नोबेल पुरस्कार मोदी सरकार को दिया जाए।
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) June 22, 2021
'मोदी है, मुमकिन है' को अब पढ़ना चाहिए 'मोदी है, चमत्कार है'
सर्वात जास्त लसीकरण होणाऱ्या १० राज्यांपैकी ७ मध्ये भाजपाचं सरकार
लसीकरणाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यासाठी साठा करण्यात आला. मध्य प्रदेशासह काही राज्यात सोमवारी रेकॉर्डस्तरीय आकडे गाठण्यासाठी अनेक दिवसांपासून लसींचा साठा जमा केला होता असा आरोप आहे. सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या १० राज्यांपैकी ७ राज्यात भाजपाचं सरकार आहे असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.