coronavirus: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाचा संसर्ग, ट्विट करून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 03:25 PM2021-04-20T15:25:16+5:302021-04-20T15:26:02+5:30

Rahul Gandhi tests Corona positive : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्वत: राहुल गांधी यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.

coronavirus: Congress leader Rahul Gandhi tests positive for COVID19 with mild symptoms | coronavirus: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाचा संसर्ग, ट्विट करून दिली माहिती

coronavirus: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाचा संसर्ग, ट्विट करून दिली माहिती

googlenewsNext

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्वत: राहुल गांधी यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (Congress leader Rahul Gandhi tests positive for COVID19 with mild symptoms)

कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती ट्विटच्या माध्यमातून देताना राहुल गांधी म्हणाले की, कोरोनाची काही सौम्य लक्षणे जाणवू लागल्यानंतर मी चाचणी करून घेतली होती. त्यात मला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी. तसेच सुरक्षित राहण्यासाठी कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी या ट्विटमधून केले आहे.  

 

दरम्यान, देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरामध्ये कोरोनाचे तब्बल २ लाख ५९ हजार १७० नवे रुग्ण सापडले आहेत. तर १ हजार ७६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कोरोना पॉझिटिव्ह, उपचारासाठी एम्समध्ये दाखल
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर त्यांना दिल्ली येथील एम्सच्या ट्रामा सेन्टरमध्ये भर्ती करण्यात आले आहे. 88 वर्षीय मनमोहन सिंग यांनी कोरोना व्हायरस लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मनमोहन सिंग यांनी रविवारी कोरोना संकटासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी सरकारला अनेक सूचना दिल्या होत्या. सध्या मनमोहन सिंग हे स्वतःच कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. 

Read in English

Web Title: coronavirus: Congress leader Rahul Gandhi tests positive for COVID19 with mild symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.