Coronavirus : काँग्रेसला कोरोनाचा धसका, 'दांडी यात्रा' पुढे ढकलण्याचा घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 09:07 PM2020-03-09T21:07:27+5:302020-03-09T21:31:14+5:30
काँग्रेसकडून 12 मार्चला आतापर्यंतची सर्वात मोठी दांडी यात्रा गुजरातमध्ये आयोजित करण्यात आली होती.
नवी दिल्ली : काँग्रेसकडून 12 मार्चला आतापर्यंतची सर्वात मोठी दांडी यात्रा गुजरातमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ही दांडी यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
Congress party postpones their 'Gandhi Sandesh Yatra', scheduled on March 12, due to #Coronavirus.
— ANI (@ANI) March 9, 2020
Congress was scheduled to start the Yatra on party's 90th anniversary on 12 March from Ahmedabad which was to conclude on 6th April in Dandi. pic.twitter.com/6HJ8pGfgU6
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रा सुरू केला होती, ती 6 एप्रिल 1930 रोजी संपली होती. महात्मा गांधींच्या या ऐतिहासिक दांडी यात्रेला यंदा 90 वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे काँग्रेसकडून दांडी यात्रा काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच या दांडी यात्रेत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सहभागी होणार होते.
#गांधीसंदेशयात्रा
— Amit Chavda (@AmitChavdaINC) March 9, 2020
गांधी अतित नही ,भविष्य भी है । pic.twitter.com/YHZEjUOeoB
दरम्यान, चीनमधून सुरुवात होऊन हळुहळू जगभरात पसरत चाललेल्या कोरोना विषाणूमुळे मानवजातीसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे जगभरात आतापर्यंत ३८०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. चीनपाठोपाठ इराण आणि इटलीमध्ये कोरोनाचा कहर दिसून येत आहे. तसेच भारतातील कोरोना रुग्णांची संख्या देखील आता 43वर पोहचली आहे. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.