CoronaVirus: “मोदी ‘सिस्टिम’ला झोपेतून जागे करणे गरजेचे”: राहुल गांधींचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 01:28 PM2021-05-18T13:28:36+5:302021-05-18T13:30:54+5:30
CoronaVirus: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.
नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्या काही अंशी घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत असून, कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सिस्टिमला झोपेतून जागे करणे गरजेचे आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. (coronavirus congress rahul gandhi says modi systems need to wake up)
गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीका करत आहे. कोरोना लसीकरण मोहीम, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन यांवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत आहेत. अशातच पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
आने वाले समय में बच्चों को कोरोना से सुरक्षित करना होगा। पीडियाट्रिक स्वास्थ्य सुविधाएँ व वैक्सीन-इलाज के प्रोटोकॉल अभी से तैयार होने चाहिए।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 18, 2021
देश के भविष्य के लिए वर्तमान मोदी ‘सिस्टम’ को नींद से जगाना ज़रूरी है।
मोदी ‘सिस्टिम’ला झोपेतून जागे करणे गरजेचे
आगामी काळात मुलांना कोरोनापासून संरक्षित करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत बालरोग सेवा आणि लस उपचार प्रोटोकॉल आधीच तयार करणे आवश्यक आहे. भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे आवश्यक आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. यापूर्वीही पीएमकेअरचे व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान यांच्यात अनेक समानता आहेत. हे दोघेही जास्त खोटा प्रचार करतात – हे दोघेही आपले काम करण्यात अपयशी ठरतात – दोघांनाही सापडणे कठीण आहे, अशी टीका राहुल गांधीनी केली होती.
चिंतेत भर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९ डॉक्टरांनी गमावला जीव; बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू
देशात कोणाच्याही जीवाची किंमत राहिलेली नाही
दुसऱ्या देशातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भारतातून कोरोना लसींचे डोस परदेशात पाठवण्यात आले. जेणेकरून तेथून येणारे नागरिक भारतात आल्यावर कोरोनाचा फैलाव होऊ नये. याचाच अर्थ केंद्रातील मोदी सरकारला दुसऱ्या देशातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिक चिंता होती. त्यासाठीच एक कोटी कोरोना लसी पाठवण्यात आल्या. यावर हसावं की रडावं हेच समजत नाही. आता सत्य बाहेर पडू लागले, तेव्हा सर्व लसी निर्यात केलेल्या नाहीत, अशी सारवासरव केंद्र सरकार करत आहे, असे रवीश कुमार यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था ‘राम भरोसे’; हायकोर्टाने योगी सरकारला सुनावले
दरम्यान, देशात गेल्या २४ तासात २,६३,५३३ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ४,२२,४३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४,३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या भारतात ३३,५३,७६५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच १८ कोटी ४४ लाख ५३ हजार १४९ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.