CoronaVirus News : "हजारो मुलं-मुली रस्त्यावर... आज भारत माता रडतेय"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 10:18 AM2020-05-13T10:18:31+5:302020-05-13T10:30:07+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमुळे अनेकांना काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे.
नवी दिल्ली - कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 70,000 वर पोहोचली आहे. तर 1800 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांना काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. रोजगारासाठी, नोकरीसाठी, उद्योगासाठी आलेल्या नागरिकांनी आपला गाव गाठायला सुरुवात केली होती. जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीच्या संकटापासून वाचायचं असेल तर गाव हे सुरक्षित ठिकाण नागरिकांना वाटू लागले आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे.
'हजारो मुलं-मुली रस्त्यावर... आज भारत माता रडत आहे' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला संबोधन सुरू असताना राहुल गांधी यांनी भारत माता आज रडतेय असा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच रस्त्यांवरून पायी चालणाऱ्या लाखो कामगार बंधू-भगिनींना त्यांच्या घरी सुरक्षितपणे पोहोचवण्याची व्यवस्था करा. या संकटात दिलासा देण्यासाठी त्यांच्या खात्यात थेट 7500 रुपये जमा करा असं देखील राहुल यांनी म्हटलं आहे.
प्रधानमंत्री जी से मेरा आग्रह है कि आज रात के सम्बोधन में सडकों पर चलते हमारे लाखों श्रमिक भाइयों-बहनों को उनके घरों तक सुरक्षित पहुंचाने की घोषणा करें। इसके साथ ही इस संकट के समय में सहारा देने के लिए उन सभी के खातों में कम से कम 7500 रु का सीधा हस्तांतरण दें। pic.twitter.com/ot0T4jAyTR
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 12, 2020
'मुलांना लागलं तर आईलाही रडू येतं. अशी कुठलीच आई नाही जी मुलाच्या वेदना पाहून दुःखी होणार नाही. आज भारत माता रडते आहे. कारण या मातेची हजारो मुलं-मुली उपाशी पोटी रस्त्यांवर अनेक किलोमीटर पायी चालत आहेत. त्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवावं अशी माझी सरकारला विनंती आहे. तसेच सरकारने त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे जमा करावेत. त्यांच्या रोजगारासाठी लघु-मध्यम उद्योग क्षेत्राला लवकरात लवकर आर्थिक पॅकेज जाहीर करावं' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : मंत्री शिंकले, सगळेच घाबरले अन् पुढे झालं असं काही...https://t.co/Bj8Tfs0GHb#CoronaUpdatesInIndia#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) May 13, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना संबोधित केले. देशातील नागरिकांसाठी 20 लाख कोटींच्या पॅकेजचीही घोषणा केली. मात्र, गावाकडे, घराकडे वापस जाणाऱ्या मजुरांच्या आत्ताच्या परिस्थितीसंदर्भात मोदी काहीच बोलले नाहीत. यावरुन काँग्रेसने मोदींना लक्ष्य केले आहे. देशभरात स्थलांतरीत करत असलेल्या मजूर, कामगार, गरिब वर्गातील नागरिकांना सर्वात प्रथम मदत मिळणे गरजेचं आहे. आज आपण या कामगारांसाठी काहीतरी पॅकेज जाहीर कराल, अशी आशा होती. देश आणि राष्ट्रनिर्मित्तीसाठी कार्यरत असलेल्या मजूर आणि कष्टकरी बांधवांप्रति आपली निष्ठुरता आणि असंवेदनशीलता निराशाजनक असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. तसेच, मोदींनी जे पॅकेज जाहीर केलं ते सत्यात उतरण्याची वाट पाहात आहोत, असंही सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
CoronaVirus News : ... म्हणून 50 हजार गर्भवतींची होणार कोरोना टेस्ट; 'या' राज्याने घेतला निर्णय https://t.co/K60XaNQq8m#CoronaUpdatesInIndia#PregnantWoman#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) May 13, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : मंत्री शिंकले, सगळेच घाबरले अन् पुढे झालं असं काही...
CoronaVirus News : ... म्हणून 50 हजार गर्भवतींची होणार कोरोना टेस्ट; 'या' राज्याने घेतला निर्णय
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! 'या' शहरात 'कॅश ऑन डिलिव्हरी'वर बंदी
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'ही' सवय फायदेशीर ठरेल; 50 टक्के संसर्गाचा धोका टळेल
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल; कोट्यवधी लोकांना होणार फायदा
लॉकडाऊननंतर इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल-डिझेल महागणार?; 'हे' आहे कारण