CoronaVirus News : संतापजनक! मजूर दाम्पत्याला शौचालयात केलं क्वारंटाईन, फोटो व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 04:15 PM2020-05-04T16:15:04+5:302020-05-04T16:24:39+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन आणि टेस्टच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. अशातच एका मजूर दाम्पत्याला शौचालयात क्वारंटाईन केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

CoronaVirus Marathi News guna uproar over quarantine labourer couple in toilet SSS | CoronaVirus News : संतापजनक! मजूर दाम्पत्याला शौचालयात केलं क्वारंटाईन, फोटो व्हायरल 

CoronaVirus News : संतापजनक! मजूर दाम्पत्याला शौचालयात केलं क्वारंटाईन, फोटो व्हायरल 

googlenewsNext

गुना - कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन आणि टेस्टच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. अशातच एका मजूर दाम्पत्याला शौचालयात क्वारंटाईन केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील राघोगड शहरातील तोडारा ग्रामपंचायतीतील देवीपुरा येथील प्राथमिक शाळेच्या शौचालयात एका मजूर दाम्पत्याला क्वारंटाईन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शौचालयात जेवणार्‍या दाम्पत्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. फोटो व्हायरल झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मजूर दाम्पत्याला गावातील प्राथमिक शाळेच्या शौचालयात क्वारंटाईन करण्यात आले. तेथेच त्यांना जेवण देण्यात येते. गावचे सरपंच आणि सचिवांच्या आदेशानुसारच त्यांना शौचालयात जेवण देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. राघोगड जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दोषींवर कारवाई करण्यात येईल असं देखील अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मजूर दाम्पत्याचे शौचालयात क्वारंटाईन केलेले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या दाम्पत्याला लगेचच एका शाळेच्या इमारतीत हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे या संतापजनक प्रकारावरून काँग्रेसने राज्यातील सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! आता घरबसल्या शेतमालाची विक्री, सरकारने लाँच केलं अ‍ॅप

CoronaVirus News : ...म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी डॉक्टरांच्या नावावरून ठेवलं आपल्या मुलाचं नाव

CoronaVirus News : दारुसाठी काय पण! तळीरामांना सोशल डिस्टंसिंगचाही विसर, पोलीस आले अन्...

 

Web Title: CoronaVirus Marathi News guna uproar over quarantine labourer couple in toilet SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.