CoronaVirus News : कोरोनापासून संरक्षण करणार 'मोदी मास्क'?; लोकांनी दिला असा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 03:35 PM2020-06-16T15:35:42+5:302020-06-16T15:54:45+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: सध्या बाजारात विविध प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. मोदी जॅकेटनंतर आता मोदी मास्क आले आहेत. 

CoronaVirus Marathi News modi mask will protect you corona | CoronaVirus News : कोरोनापासून संरक्षण करणार 'मोदी मास्क'?; लोकांनी दिला असा प्रतिसाद

CoronaVirus News : कोरोनापासून संरक्षण करणार 'मोदी मास्क'?; लोकांनी दिला असा प्रतिसाद

Next

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन यासारखे खबरदारीचे उपाय केले जात आहेत. तसेच घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या बाजारात विविध प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. मोदी जॅकेटनंतर आता मोदी मास्क आले आहेत. 

कोरोनाच्या संकटात बाजारात मास्कला मोठ्याप्रमाणात मागणी आहे. याच दरम्यान राजकीय नेतेमंडळींच्या चेहऱ्याचे हटके मास्कही आले आहेत. यामध्ये खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याच्या मास्कला लोकांनी अधिक पसंती दिल्याची माहिती मिळत आहे. भोपाळमध्ये राहुल गांधी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि कमलनाथ यांचे देखील मास्क असल्याने लोकांना हे पर्यायही उपलब्ध आहेत. मात्र यातही नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याचा मास्कला सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. 

कापड दुकानदार कुणाल परियानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याच्या मास्कची आम्ही विक्री करत आहोत. आतापर्यंत 500 ते 1000 मोदी मास्क विकले असून त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचा मास्कही लोकांच्या पसंतीस पडत आहे. याशिवाय राहुल गांधी, कमलनाथ यांच्या चेहऱ्याचे मास्कही उपलब्ध आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अमेरिकेतील गेम डिझायनर आणि प्रोग्रामर टेलर ग्लेयल यांनी हटके मास्क तयार केला आहे. कोरोनापासून वाचवणारा LED मास्क तयार करण्यात आला आहे. मास्कमध्ये एलईडी लाईट्स लावण्यात आल्या आहेत. बोलताना तोंडाची हालचाल होईल त्यानुसार लाईट्स असणार आहेत. त्यामुळेच जेव्हा हसतो तेव्हा मास्कही हसताना दिसणार आहे. मास्कवर चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन दिसणार आहेत. एका मास्कची किंमत जवळपास 3800 रुपये आहे. टेलर यांनी हा मास्क सध्या तरी फक्त स्वत:साठी तयार केला आहे. विक्रीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : तुमच्या घरात 'विषारी सॅनिटायझर' तर नाही ना?; CBI ने केलं अलर्ट, वेळीच व्हा सावध

भयंकर! जादुटोण्याच्या संशयातून काकीची हत्या; शिर हातात घेऊन 'तो' 13 किमी चालला अन्...

"सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर आधी पेशंटच्या खाटेचं बघा"  

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येनंतर राहुल गांधींचं 'ते' ट्विट व्हायरल; पण...

Fuel Price: महागाईचा चटका! इंधन दरवाढीचा भडका उडणार, दोन आठवडे रोज पेट्रोल-डिझेल महागणार

CoronaVirus News : सलाम! 'या' डॉक्टरांनी जिंकलं सर्वांचं मन; पीपीई सूटवरील फोटोमागे 'हे' आहे कारण

Web Title: CoronaVirus Marathi News modi mask will protect you corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.