CoronaVirus News : "काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही राहुल गांधींचं ऐकत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 03:45 PM2020-05-27T15:45:22+5:302020-05-27T16:05:19+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: 'जेव्हापासून कोरोनासारखी दुर्देवी परिस्थिती देशावर ओढावली आहे तेव्हापासून राहुल गांधी या लढाईमध्ये देशातील नागरिकांचा संकल्प तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सरळ सरळ खोटं बोलत आहेत आणि चुकीची वक्तव्ये करत आहेत.'

CoronaVirus Marathi News ravi shankar prasad replied rahul gandhi SSS | CoronaVirus News : "काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही राहुल गांधींचं ऐकत नाही"

CoronaVirus News : "काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही राहुल गांधींचं ऐकत नाही"

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली रणनीती पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे. आता सरकारने स्पष्ट करावे की, त्यांच्याकडे काय धोरण आहे? जेणेकरून, हा आजार, देशाची अर्थव्यवस्था आणि गरिबांच्या समस्यांवर तोडगा निघू शकेल अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारला लक्ष्य केले. मात्र याला भाजपाच्या वतीने आता जोरदार उत्तर दिलं आहे. भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करत निशाणा साधला आहे. 

'जेव्हापासून कोरोनासारखी दुर्देवी परिस्थिती देशावर ओढावली आहे तेव्हापासून राहुल गांधी या लढाईमध्ये देशातील नागरिकांचा संकल्प तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सरळ सरळ खोटं बोलत आहेत आणि चुकीची वक्तव्ये करत आहेत. आकडे आणि माहितीमध्ये फेरफार करुन ते लोकांसमोर मांडत आहेत' असं रविशंकर यांनी म्हटलं आहे. तसेच राहुल गांधी काहीही विचार न करता बोलतात. त्यांनी विषयाचा नीट अभ्यास केलेला नसतो. स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर ते केवळ राजकारण करत आहेत. काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील सरकारेही राहुल गांधीचं ऐकत नाहीत असं देखील रविशंकर यांनी म्हटलं आहे. 

'भिलवाडा मॉडेलसाठी सोनिया गांधी यांनी राहुल गांधींना श्रेय दिलं होतं. मात्र तेथील सरपंचांनीच हे सर्व लोकांच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याचं नंतर स्पष्ट केलं होतं. कोरोनाच्या लढाईमध्ये वायनाडला मोठे यश मिळाल्याचा दावा त्यांनी आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने केला होता. मात्र सत्य परिस्थिती ही आहे की वायनाड केरळमधील कोरोना हॉटस्पॉट झाला होता' असं भाजपाच्या रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं आहे. 

रविशंकर यांनी 'महाराष्ट्र सरकारच्या अपयशापासून राहुल गांधी दूर पळत आहेत. महाराष्ट्रासंदर्भातील निर्णयांमध्ये आम्ही सहभागी नाही असं ते सांगतात. याचाच अर्थ ते महाराष्ट्र सरकारच्या अपयशापासून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आम्हाला सल्ला देण्यापेक्षा आधी स्वत:ची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील काम पाहावे' अशा शब्दांत राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी दिवा लावण्याचं आवाहन केलं होतं तेव्हा त्याचीही राहुल यांनी खिल्ली उडवली होती. देशाची एकात्मता तोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यासोबतच मजुरांबद्दल ट्विट करुन नाटकही त्यांनी केलं असं म्हणत त्यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : प्रेमासाठी काय पण! लॉकडाऊनमध्ये गर्लफ्रेंडसाठी 'तो' झाला 'ती' अन् घडलं असं काही...

CoronaVirus News : भयंकर! आधी जिवंत व्यक्तीला केलं मृत घोषित, कुटुंबाला सोपवला भलताच मृतदेह पण...

Video - 'अम्फान'नंतर दोन गटांमध्ये जोरदार राडा, तुफान हाणामारी; पोलीस आले अन्...

CoronaVirus News : 'रेल्वेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार करण्याचा प्रयत्न', 'या' सरकारचा गंभीर आरोप

CoronaVirus News : दिलासादायक! देश कोरोनाची लढाई जिंकणार, 'हा' नवा फॉर्म्युला फायदेशीर ठरणार?

CoronaVirus News : शाळा-कॉलेज कधी सुरू होणार?; केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलं उत्तर

CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासात एकाच दिवशी 7 मजुरांचा मृत्यू; कारण वाचून व्हाल हैराण

CoronaVirus News : धक्कादायक! खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह

Web Title: CoronaVirus Marathi News ravi shankar prasad replied rahul gandhi SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.