CoronaVirus News: कोरोना संकट २०२१ पर्यंत सोबत राहील -आशिष झा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 11:49 PM2020-05-27T23:49:36+5:302020-05-27T23:49:54+5:30
- शीलेश शर्मा नवी दिल्ली : कोरोना महामारीचे संकट जेव्हा त्यावरील लस बाजारात येईल तेव्हाच संपेल. सध्या लस येण्याची ...
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : कोरोना महामारीचे संकट जेव्हा त्यावरील लस बाजारात येईल तेव्हाच संपेल. सध्या लस येण्याची आशा नाही. याचा अर्थ असा की, आम्हाला २०२१ येईपर्यंत या संकटासोबत राहावे लागेल, असे स्पष्टपणे मूळ भारतीय व ख्यातनाम अमेरिकन लोक आरोग्य विशेषज्ज्ञ आशिष झा आणि जोहान गिसेक यांनी सांगितले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी या दोघांनी केलेल्या चर्चेत हे सांगितले. झा यांचे म्हणणे असे की, येत्या काळात आम्हाला खूप धोकादायक विषाणूला तोंड द्यावे लागेल. जे जगणे पाच वर्षांपूर्वी होते ते येत्या पाच वर्षांत बदलून जाईल. कोरोनामुळे आर्थिक आणि आरोग्यासंबंधी प्रश्नांसह त्याचा मनोवैज्ञानिक दुष्परिणाम वेगाने होत आहे.
सरकारला याकडे लक्ष द्यावे लागेल. लॉकडाऊनच्या माध्यमातून तुम्ही लोकांना हा विचार करायला भाग पाडत आहात की परिस्थिती गंभीर आहे. परंतु, आर्थिक व्यवहार सुरू करताना लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे याचा विसर पडतो.