Coronavirus: तुमचा पक्ष तर डोकं आणि पायाशिवाय चालतोय; मनोज जोशींचा काँग्रेसवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 02:22 PM2020-04-14T14:22:02+5:302020-04-14T14:26:04+5:30
गेल्या महिन्यात मध्य प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार स्थापन झालं, त्यानंतर काँग्रेसच्या कमलनाथ यांनी शिवराज सिंह चौहान आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असल्यानं मोदींनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवलं आहे. कोरोनाविरोधात सगळा देश एकवटला असता तरी राजकीय नेत्यांचं राजकारण सुरूच आहे. अनेक राजकीय नेते कोरोनाच्या गंभीर परिस्थितही एकमेकांवर चिखलफेक करताना पाहायला मिळत आहेत. मध्य प्रदेशमध्येही आता राजकीय नाट्याला वेग आला आहे. गेल्या महिन्यात मध्य प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार स्थापन झालं, त्यानंतर काँग्रेसच्या कमलनाथ यांनी शिवराज सिंह चौहान आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करायची होती म्हणूनच मोदी सरकारनं कोरोनासंदर्भात उशिरानं उपाययोजना केली, असा आरोप कमलनाथ यांनी केला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री सोडल्यास मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, त्यामुळे जनतेचं भवितव्यच धोक्यात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या सर्व प्रकारावर आता अभिनेते मनोज जोशी व्यक्त झाले आहेत. त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे.
मध्य प्रदेशमधल्या भाजपा सरकारचं सध्या मंत्र्यांशिवाय कामकाज सुरू असल्यानं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना टेन्शन आलं आहे. परंतु तुमचा कॉंग्रेस पक्ष तर डोकं आणि पायाशिवाय चालतोय. कोणतीही विचारधारा नाही, नेता नाही... कार्यकर्ता नाही', असं ट्विट करत मनोज जोशींनी काँग्रेसवर घणाघात केला आहे.मध्यप्रदेश के पूर्व मुख्यमंत्री कमलनाथ इस बात को लेकर परेशान हैं कि एमपी की भाजपा सरकार बिना मंत्रियों के चल रही।
— Manoj Joshi (@actormanojjoshi) April 12, 2020
भाई आपकी पुरी काँग्रेस पार्टी बिना सर पैर के चल रही है। न विचारधारा है, न नेता, न कार्यकर्ता।