CoronaViurs: 'त्या' व्हायरल फोटोंवरून दिग्विजय सिंह अन् मुलावर ज्योतिरादित्य शिंदेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 11:35 AM2020-05-07T11:35:44+5:302020-05-07T11:40:18+5:30

4 मे रोजी मध्य प्रदेश कॉंग्रेसने टॉयलेटमध्ये अलगीकरणात ठेवलेल्या कुटुंबाचे एक चित्र आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केले होते.

CoronaViurs: jyotiraditya scina attack on congress digvijay and his son vrd | CoronaViurs: 'त्या' व्हायरल फोटोंवरून दिग्विजय सिंह अन् मुलावर ज्योतिरादित्य शिंदेंचा पलटवार

CoronaViurs: 'त्या' व्हायरल फोटोंवरून दिग्विजय सिंह अन् मुलावर ज्योतिरादित्य शिंदेंचा पलटवार

Next
ठळक मुद्देभाजपामध्ये प्रवेश घेतल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसविरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत.मध्य प्रदेशातील कॉंग्रेस सातत्यानं त्यांच्याविरोधात बेछूट आरोप करत सुटली आहे, पण शिंदे यांनी गप्प बसणं पसंत केलं होतं.आता शिंदेंनीही दिग्विजय सिंग आणि त्यांच्या मुलाला त्या व्हायरल फोटोंवरून खिंडीत गाठलं आहे. 

भोपाळः भाजपामध्ये प्रवेश घेतल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसविरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे. मध्य प्रदेशातील कॉंग्रेस सातत्यानं त्यांच्याविरोधात बेछूट आरोप करत सुटली आहे, पण शिंदे यांनी गप्प बसणं पसंत केलं होतं. काँग्रेसनंज्योतिरादित्य शिंदे निवडणूक लढवत असलेल्या मतदारसंघातील अलीकडेच शौचालयात क्वारंटाईन केलेल्या कुटुंबाचे छायाचित्र सामायिक करताना त्यांच्यावर हल्लाबोल केला होता.

आता शिंदेंनीही दिग्विजय सिंग आणि त्यांच्या मुलाला त्या व्हायरल फोटोंवरून खिंडीत गाठलं आहे.  खरं तर, 4 मे रोजी मध्य प्रदेश कॉंग्रेसने टॉयलेटमध्ये अलगीकरणात ठेवलेल्या कुटुंबाचे एक चित्र आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केले होते. ज्यामध्ये लिहिले होते की, 'शौचालयात जेवण करण्यास हतबल, शिंदेंच्या लोकसभा मतदारसंघाचे चित्र'. भाजप नेते असलेल्या शिंदेंच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातील चित्र असल्याचंही काँग्रेसनं म्हटलं आहे. ज्यामध्ये गरीब कुटुंब शौचालयात अलग ठेवण्यात आले आहे. ट्विटमध्ये पुढे असेही सांगितले गेले होते की, जे लोक वारंवार रस्त्यावर उतर होते, ते या प्रकरणामुळे जनतेच्या नजरेतूनच उतरले आहेत. 

ज्योतिरादित्य शिंदेंनी दिलं प्रत्युत्तर
कॉंग्रेसचे आरोप आणि काही माध्यमांच्या वृत्तानंतर ज्योतिरादित्य शिंदेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हे चित्र दिग्विजय सिंग यांच्या माजी लोकसभा मतदारसंघ राजगड आणि त्यांचे पुत्र जयवर्धन सिंह यांच्या विधानसभा मतदारसंघाचे आहे. या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे मी जिल्हा प्रशासनाला आवाहन केले आहे. शिंदे यांनी ट्विट देखील रिट्वीट केले असून, ते म्हणाले की, हे चित्र राजगड लोकसभा मतदारसंघातील प्राथमिक शाळा देवीपुरा आणि राघळ विधानसभेच्या टोडारा ग्रामपंचायतीचे आहे. जिथे दिग्विजय सिंग यांच्या कुटुंबातील सदस्य अनेक दशकांपासून लोकप्रतिनिधी आहेत.

शिवराज सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली संबल योजना कमलनाथ यांच्या सरकारने थांबविली होती. शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी पुन्हा ती सुरू केली. ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, संबल योजना सर्व वर्गातील गरिबांसाठी आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी असलेली ही योजना मागील दंगलीमुळे कॉंग्रेस सरकारने बंद केली होती. शिवराज सिंह यांनी पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी ही योजना सुरू केली.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus: आम्ही कोणत्याही युद्धासाठी तयार; चिनी सैन्याची अमेरिकेला थेट धमकी

Coronavirus: जगाची भारताकडे नजर; बुद्धांनी सांगितलेल्या चार मार्गांवरून देशाची वाटचाल- नरेंद्र मोदी

Coronavirus: कोरोना विषाणूवर मोठं संशोधन; पण खुलासा करण्याआधीच चिनी वैज्ञानिकाची गोळ्या घालून हत्या

CoronaVirus News: कोरोनाची लस जगाला देणार का?; भारताचा उल्लेख करुन इस्रायलचं लय भारी उत्तर

पाकिस्तानातून राजस्थानमार्गे भारतात येतंय नवं संकट; शेतकऱ्यांना सतावतेय चिंता

Web Title: CoronaViurs: jyotiraditya scina attack on congress digvijay and his son vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.