नियोजनाअभावी कोरोनाविरुद्ध 21 दिवसांत युद्ध जिंकता आले नाही- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 01:39 AM2020-12-20T01:39:49+5:302020-12-20T01:40:31+5:30
Rahul Gandhi : देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीपेक्षा अधिक झाल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाऊनमुळे लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.
नवी दिल्ली : २१ दिवसांत कोरोना साथीविरोधातील युद्ध जिंकू हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला शब्द नियोजनशून्य पद्धतीने लॉकडाऊन लागू केल्याने खरा ठरला नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीपेक्षा अधिक झाल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाऊनमुळे लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्चमध्ये सांगितले होते की, महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकण्यात आले. आता आपण कोरोनाविरोधातील युद्ध २१ दिवसांत जिंकू. या उद्गारांचा संदर्भ देत मोदी यांना कोपरखळी मारताना राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, कोरोनाविरुद्धचे युद्ध तर जिंकता आले नाहीच, मात्र या साथीमुळे देशात सुमारे दीड लाख लोकांचा बळी गेला
आहे.
नोटाबंदी, चीनच्या घुसखोरीवर पंतप्रधान मोदी खोटे बोलले : कपिल सिब्बल
पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदी, कोरोना साथ, चीनची घुसखोरी या तीन मुद्यांवर देशातील जनतेसमोर धडधडीत खोटे बोलले आहेत, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केला आहे. नवीन कृषी कायद्यांबद्दल तीन खोट्या गोष्टी काही लोकांकडून पसरविल्या जात आहेत, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केला होता. त्याला उत्तर देताना सिब्बल म्हणाले की, नोटाबंदीनंतर पन्नास दिवसांत देशातील सर्व स्थिती सुरळीत होईल.
nकोरोना साथीवर २१ दिवसांत विजय मिळवू, चीनने भारतीय भूमीवर घुसखोरी केलेलीच नाही, अशी खोटी विधाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहेत.