Delhi Election Results: आपकडून बहुमताचा आकडा सहज पार; यंदा तरी काँग्रेस भोपळा फोडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 10:31 AM2020-02-11T10:31:15+5:302020-02-11T10:39:18+5:30
मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये आपने 53 जागांवर आघाडी घेतली असून भाजपा 17 जागांवर आघाडीवर आहे.
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणील सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कालांनूसार राज्यात पुन्हा एकदा सत्तास्थापना करण्यासाठी 'आप' यशस्वी ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
Delhi: Counting of votes underway, visuals from a counting centre in Shastri Park. #DelhiResultspic.twitter.com/62um69VNkl
— ANI (@ANI) February 11, 2020
मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये आपने 53 जागांवर आघाडी घेतली असून भाजपा 17 जागांवर आघाडीवर आहे. तसेच 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत खातंही न उघडणाऱ्या काँग्रेसला सुरुवातीच्या कलांमध्येही भोपळाही फोडता आलेला नाही.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निवडणुकीत देखील आप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज अंदाज सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवला होता. दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ तीन जागा जिंकण्यात यश मिळालं होतं.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 8 फेब्रुवारी 2020 रोजी मतदान पार पडलं. यावेळी 55 टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद करण्यात आलीय. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 22 फेब्रुवारी रोजी संपणार आहे.