Delhi Election : दिल्लीच्या ७० विधानसभा जागांसाठी आज मतदान; पोलीस बंदोबस्तात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 04:20 AM2020-02-08T04:20:16+5:302020-02-08T06:27:41+5:30
जामिया मिलिया, जेएनयू व शाहीनबाग येथील सीएएविरोधी आंदोलन हे निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे बनले होते.
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या ७0 जागांसाठी आज मतदान होणार असून, रिंगणात उतरलेल्या ६७२ उमेदवारांचे भवितव्य त्यात ठरणार आहे. निवडणुकीसाठी दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. जामिया मिलिया, जेएनयू व शाहीनबाग येथील सीएएविरोधी आंदोलन हे निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे बनले होते.
Delhi: Police check vehicles at Delhi-Gurugram border ahead of the voting for #DelhiElections2020. The voting begins at 8 AM today. pic.twitter.com/UEwpKmmdjV
— ANI (@ANI) February 7, 2020
दिल्लीतील तयारीचा राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी आढावा घेतला. सायंकाळपासूनच मतदान केंद्रावर अधिकारी दाखल झाले होते. केंद्राचा परिसर सुरक्षा रक्षकांनी वेढला होता. काही ठिकाणी वाहतूकही वळविण्यात आली. ही निवडणूक आम आदमी पक्षासाठी अटीतटीची, भारतीय जनता पक्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेतृत्व कसोटी पाहणारी, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. निवडणूक प्रचारात स्थानिक ते राष्ट्रीय मुद्दे प्रचारात गाजले. अनेक आयाराम-गयारामही यंदा रिंगणात उतरले आहेत.
Delhi: A Sub-Inspector of Delhi Police - Preeti, posted in Patparganj Industrial Area Police Station, was found dead with multiple bullet injuries in Rohini area, earlier tonight. Forensic team and Police are present at the spot. pic.twitter.com/1tRejhCpjV
— ANI (@ANI) February 7, 2020
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, तसेच गोपाल राय व आतिशी (सर्व आप), भाजपचे आशीष सूद, तेजिंदरपाल बग्गा, विजेंदर गुप्ता आणि अरविंदरसिंह लवली, कृष्णा तीरथ, अलका लांबा हे महत्त्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.