स्मृती इराणी यांच्या मुलीला दिल्ली हायकोर्टाने दिली क्लीन चिट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 07:16 PM2022-08-01T19:16:16+5:302022-08-01T19:22:41+5:30

Smriti Irani : या प्रकरणाची शुक्रवारी (29 जुलै) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली, ज्याचा तपशीलवार आदेश आता समोर आला आहे.

Delhi High Court gave a clean chit to Smriti Irani's daughter | स्मृती इराणी यांच्या मुलीला दिल्ली हायकोर्टाने दिली क्लीन चिट

स्मृती इराणी यांच्या मुलीला दिल्ली हायकोर्टाने दिली क्लीन चिट

googlenewsNext

गोव्यातील रेस्टॉरंटच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीउच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांची मुलगी (जोईश इराणी) त्या रेस्टॉरंटच्या मालक नाहीत, असे दिल्लीउच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच त्या रेस्टॉरंटच्या संबंधात त्याने कधीही परवान्यासाठी अर्ज केला नाही. या प्रकरणाची शुक्रवारी (29 जुलै) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली, ज्याचा तपशीलवार आदेश आता समोर आला आहे.

न्या.मिनी पुष्कर्ण यांनी दिल्ली उच्च न्यायालयात ही टिप्पणी केली. त्यांनी काँग्रेस नेते जयराम रमेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसोझा यांना समन्स पाठवले आहे. स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावर हे समन्स पाठवण्यात आले आहे. इराणी यांनी या नेत्यांना 2 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने काँग्रेस नेते पवन खेरा यांनी स्मृती इराणी यांच्या मुलीशी संबंधित ट्विट तात्काळ डिलीट करण्याचे आदेश दिले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देताना म्हटले आहे की, गोव्यातील ते रेस्टॉरंट किंवा त्याची जमीन स्मृती इराणी किंवा त्यांच्या मुलीची नाही.

न्यायालयाने पुढे म्हटले की, बचाव पक्षाच्या लोकांनी (तीन काँग्रेस नेते) आणि इतर काही लोकांनी खोट्या गोष्टी सांगितल्या. यासोबतच त्यांनी स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर वैयक्तिक टप्पणीही केली. असे करून स्मृती इराणी यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम केल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने मान्य केले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, वास्तविक तथ्य जाणून न घेता मोठे आरोप केले गेले, ज्यामुळे स्मृती इराणी आणि त्यांच्या कुटुंबाची प्रतिमा खराब झाली.

स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या दिवाणी मानहानीच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते जयराम नरेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसोझा यांना समन्स बजावले असून पुढील सुनावणीत उत्तरासह हजर राहण्यास सांगितले आहे. दिवाणी खटला असल्याने मानहानीचे समन्सही बजावण्यात आले आहेत. आता पुढील सुनावणी 18 ऑगस्टला होणार आहे.

हे प्रकरण गोव्यातील सिली सॉल्स कॅफे आणि बारशी संबंधित आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी आरोप केला होता की, स्मृती इराणी यांच्या मुलीने गोव्यात रेस्टॉरंट चालवत 13 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावाने बनावट परवाना घेतला होता.

 

 

Web Title: Delhi High Court gave a clean chit to Smriti Irani's daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.