सोनिया, राहुल गांधींना उच्च न्यायालयाचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 06:26 PM2018-09-10T18:26:13+5:302018-09-10T18:29:24+5:30
आयकर विभागाने पाठविलेल्या 2011-12 या आर्थिक वर्षाच्या परताव्याच्या पुर्नमुल्यांकन नोटीसीविरोधात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
नवी दिल्ली : आयकर विभागाने पाठविलेल्या 2011-12 या आर्थिक वर्षाच्या परताव्याच्या पुर्नमुल्यांकन नोटीसीविरोधात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, आज न्यायालयाने हे आव्हान फेटाळून लावले असून आयकर विभाग केव्हाही जुन्या प्रकरणांची चौकशी करू शकत असल्याचे स्पष्ट केले आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात आयकर विभागाने राहुल आणि सोनिया गांधी यांना नोटीस पाठविली होती. यावर न्यायालयाने आयकर विभागाला जुन्या प्रकरणांची चौकशी सुरु करण्याचा अधिकार असून करदात्याने त्याबाबतचे दस्तावेज घेऊन चौकशीला सामोरे जाणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट केले.
National Herald Case: Delhi High Court says Income Tax department has powers to reopen tax proceedings and that the petitioners can approach Income Tax department with their grievances. https://t.co/vqHLzMLTJf
— ANI (@ANI) September 10, 2018
या नंतर भारत बंदवरून बॅकफूटवर आलेल्या भाजने काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली असून गांधी घराणे करचोरी प्रकरणावरूनच ओळखले जात आहे. तसेच भारताच्या कायद्याविरोधात असणारे कुटुंब असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी सांगितले.