राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे लोकशाहीच्या चौकटीला धक्का देणारे, राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 07:55 AM2020-05-27T07:55:48+5:302020-05-27T08:01:19+5:30
प्रश्न विचारल्यामुळे सरकारलाही फायदा होतो. मात्र राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे हे लोकशाहीच्या चौकटीला धक्का देणारे आहे.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट झाली आहे. दररोज हजारांहून अधिक रुग्ण सापडत असल्याने विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहेत. त्यातच कोरोनाला रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीह होत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या विरोधकांवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हल्ला चढवला आहे. राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे हे लोकशाहीच्या चौकटीला धक्का देणारे आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. मात्र ही राणेंची वैयक्तिक मागणी असल्याचे भाजपाने स्पष्ट केले होते. त्यावरून राहुल गांधी यांनी भाजपाला टीकेचे लक्ष्य केले आहे. राहुल गांधी म्हणाले की, ‘’प्रश्न विचारल्यामुळे सरकारलाही फायदा होतो. मात्र राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे हे लोकशाहीच्या चौकटीला धक्का देणारे आहे.’’
दरम्यान, राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र सरकारमधील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. आम्ही महाराष्ट्रात सरकारला पाठिंबा देत आहोत. मात्र निर्णय घेण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत. आम्ही पंजाब, छ्त्तीसगड आणि राजस्थानमध्ये निर्णय घेण्याचा स्थितीत आहोत, असे ते म्हणाले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी
लॉकडाऊन न करताच या मोठ्या देशाने कोरोनाला दिली मात, नागरिकांची ही सवय ठरली उपयुक्त
चिंताजनक! अॅमेझॉनच्या जंगलातही कोरोनाचा शिरकाव, अनेक आदिवासी जमातींचे अस्तित्व संकटात
पहिल्याच दिवशी विमानसेवेचा बोजवारा, दिल्ली, मुंबईतून जाणारी अनेक विमाने रद्द, प्रवाशांना मनस्ताप
कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचा चीनला तगडा धक्का, केली मोठी कारवाई
लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती
लोकसंख्येची घनता जेवढी जास्त, तेवढाच कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. मुंबई आणि दिल्लीत त्यामुळेच कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात सापडत आहेत. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मिळाली पाहिजे. आम्ही केंद्र सरकारला सल्ला देऊ शकते. मात्र सरकारला काय करायचे आहे, ते त्यांनाच ठरवायचे आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले होते.