"राहुल बाबा कोण घाबरतं? मैदान तुम्ही ठरवा...;" अमित शाहंचं राहुल गांधींना खुलं चॅलेन्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 05:37 PM2023-04-07T17:37:49+5:302023-04-07T17:38:29+5:30

यावेळी गृह मंत्री अमित शाह यांनी गांधी कुटुंबातील कुण्याही सदस्याचे नाव न घेता, संसदेतील गदारोळापासून राहुल गांधी यांच्या लोकशाहीसंदर्भातील वक्तव्यावर जबरदस्त हल्ला चढवला.

Democracy is not in danger your family is in danger Amit Shah attacked Rahul Gandhi without naming him | "राहुल बाबा कोण घाबरतं? मैदान तुम्ही ठरवा...;" अमित शाहंचं राहुल गांधींना खुलं चॅलेन्ज

"राहुल बाबा कोण घाबरतं? मैदान तुम्ही ठरवा...;" अमित शाहंचं राहुल गांधींना खुलं चॅलेन्ज

googlenewsNext


नवी दिल्ली - 'राहुल बाबा कोण घाबरतं? मैदान तुम्ही ठरवा. भाजपचे कार्यकर्ते देशात कुठेही लढायला तयार आहेत,' अशा शब्दात देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आज राहुल गांधी यांना खुले आव्हान दिले. ते उत्तर प्रदेशातील कौशांबी महोत्सव-2023 च्या उद्घाटन कार्यक्रमात जनतेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील 600 कोटींहून अधिक किमतीच्या 117 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हे प्रकल्प कौशांबीच्या विकासाची नवी दिशा ठरवतील, असेही ते यावेळी म्हणाले. 

यावेळी गृह मंत्री अमित शाह यांनी गांधी कुटुंबातील कुण्याही सदस्याचे नाव न घेता, संसदेतील गदारोळापासून राहुल गांधी यांच्या लोकशाहीसंदर्भातील वक्तव्यावर जबरदस्त हल्ला चढवला. शाह म्हणाले, "देशातील लोकशाही धोक्यात नाही, तर आपले कुटुंब धोक्यात आहे. आपण ही लोकशाही केवळ जातीयवाद, घराणेशाही आणि तुष्टीकरणाचे राजकारण या तिन्हींमध्येच अडकवून ठेवली. 

शाह म्हणाले, कालच संसदेचे कामकाज संपले. देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर चर्चा न होता संसदेचे कामकाज संपले, असे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडले नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सभागृहाचे कामकाज चालू दिले नाही. कारण राहुल गांधींना अपात्र ठरवण्यात आले. या शिक्षेला राहुल गांधींनी आव्हान द्यावे. पण आपण संसदेच्या वेळेचाच बळी दिला.’

राहुल गांधींचे संसदीय सदस्यत्व रद्द होण्यासंदर्भात बोलताना शाह म्हणाले, गुजरातमधील सुरत येथील न्यायालयाने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावली. शिक्षा होताच खासदारकी जाते. मग ती व्यक्ती कुणीही असो. आतापर्यंत 17 आमदार आणि खासदारांचे सदस्यत्व गेले आहे. राहुल गांधींचीही गेली आहे. यावर काँग्रेसच्या नेत्यांनी काळे कपडे घालून संसद बंद पाडली. पण, कायद्याचे पालन करणे हा प्रत्येक नागरिकाचा धर्म आहे, हे मी राहुल गांधींना सांगू इच्छितो, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.
 

Web Title: Democracy is not in danger your family is in danger Amit Shah attacked Rahul Gandhi without naming him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.