उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतरही काँग्रेसनं पोस्टर्स झळकावले ; "मी सावरकर नाही तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 08:03 PM2023-04-12T20:03:42+5:302023-04-12T20:04:32+5:30
या पोस्टरमुळे महाराष्ट्रातील राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
वायनाड - वीर सावरकर मुद्द्यांवरून सातत्याने वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल गांधींनाउद्धव ठाकरेंनी मालेगाव सभेत जाहीर इशारा दिला होता. सावरकर हे आमचे दैवत आहेत त्यांच्याविरोधात काही बोलाल तर खपवून घेतले जाणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनीही सावरकर मुद्द्यावरून राहुल गांधींवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर महाविकास आघाडीवर परिणाम नको यासाठी राहुल गांधींनी सावरकर मुद्दा घेणे टाळणार असल्याचं म्हटलं. परंतु काँग्रेस पक्षाने लावलेल्या पोस्टरमुळे पुन्हा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
वायनाड येथे दौऱ्यावर असणाऱ्या राहुल गांधींच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यानी पोस्टर्स लावले होते. त्यात एका स्थानिक नेत्याने वीर सावरकरांचा अपमान करणारे पोस्टर्स लावले. मी सावरकर नाही, गांधी, माफी मागणार नाही असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आले. या पोस्टरमुळे महाराष्ट्रातील राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात तुम्ही माफी मागणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. तेव्हा राहुल गांधींनी थेट माझे नाव सावरकर नाही तर गांधी आहे असं विधान केले होते. त्यावरून उद्धव ठाकरेंनी इशारा दिला होता. महाविकास आघाडी कुठलाही वाद नको यासाठी काँग्रेसनं सावरकर मुद्द्यांवर नो कमेंट्स ठरवले होते. परंतु वायनाडमध्ये राहुल गांधी यांचा रोड शो होता. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना शहरात बॅनरबाजी केली होती. त्यात मल्याळम भाषेत अनेक पोस्टर्स लागले होते. त्यात मी सावरकर नाही, माफी मागून पळून जाईन. विशेष म्हणजे राहुल गांधींची जिथे सभा होती त्याठिकाणी हे पोस्टर्स झळकत होते.
२८ मे हा दिवस महाराष्ट्रात ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन" घोषित
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती, धैर्य, प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.