गांधी कुटुंबात मतभिन्नता; काही निर्णयांमुळे सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 12:52 AM2020-09-08T00:52:52+5:302020-09-08T06:59:07+5:30

काँग्रेसमध्ये चिंता

Differences in the Gandhi family; Leaders who wrote letters to congress chief Sonia Gandhi are angry over some decisions | गांधी कुटुंबात मतभिन्नता; काही निर्णयांमुळे सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये नाराजी

गांधी कुटुंबात मतभिन्नता; काही निर्णयांमुळे सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये नाराजी

Next

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : गांधी कुटुंबात निर्णयांवरून आपापसातील मतभिन्नतेमुळे पक्षात चिंता आणि अंसतोष निर्माण झाला आहे. निर्णयांना पाहून पक्षाचे शीर्ष नेतृत्व तीन गटांत विभागले गेल्याचे दिसते. त्यामुळे निर्णय वेळेवर होत नाहीत की नव्या अध्यक्षाच्या नियुक्तीसाठी रोड मॅप बनतोय.

सरचिटणीस प्रियंका गांधी यांना फक्त उत्तर प्रदेशच्या राजकारणापुरते मर्यादित केले गेले आहे. सोनिया गांधी यांच्याशी चर्चा न करताच राज्यांत नियुक्त्या होत आहेत. पक्षाचे नेते समजतात की सगळे काही राहुल गांधी यांच्याभोवती फिरत आहे व ते निर्णयांना अंतिम रूप देत आहेत.

रविवारी उत्तर प्रदेशमध्ये ज्या समित्या बनवल्या गेल्या त्यात जितिन प्रसाद, प्रमोद कृष्णन,राजीव शुक्ला या ब्राह्मण नेत्यांची नावे नव्हती. याशिवाय श्रीप्रकाश जैस्वाल, राज बब्बर यांचीही नावे त्यात नव्हती तेही उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण १८ टक्के आहेत हे माहीत असूनही. ब्राह्मणांची राजकारणावर जोरदार पकड आहे. यानंतर येतात दलित आणि मुस्लिम.

काँग्रेससोबत त्यांना उभे केले जाऊ शकते. उत्तर प्रदेशच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, राहुल गांधी यांच्या विश्वासूंना प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या बाहेर निघू नये असे वाटते. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी सोनिया व राहुल गांधींकडे मागणी केली की प्रियंका गांधी यांना योगी यांच्या समोर पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आणावे.

आजही प्रदेश समितीत २ उपाध्यक्ष आणि ६ महासचिव नियुक्त केले गेले. परंतु, सगळ््या नियुक्त्या राहुल यांच्या इशाºयावर होत आहेत. यामुळे सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रावर सह्या करणारे नेते निराश आहेत. जितिन प्रसाद यांनी ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, पक्षात काय चालले हे मला माहिती नाही. काँग्रेसमध्ये राहायचे तर जे सांगितले जाते ते ऐकायचे.

कोरोना संकटात मोदी सरकारने देशाला वाऱ्यावर सोडून दिले -काँग्रेस

कोरोना महामारीत मोदी सरकारने संपूर्ण देशाला वाºयावर सोडून दिले, असा आरोप काँग्रेसने केला. महामारीची साथ पसरून १६६ दिवस झाले तरी मोदी सरकार चिकित्सा सुविधांची व्यवस्था करू शकले ना इतर काही उपाय. जर आकडेवारीच पाहिली तर भारत जगात या महामारीने प्रभावित होणारा क्रमांक एकचा देश होताना दिसतो. देशात कोरोना विषाणूचे एका दिवसात ९०,८०२ रुग्ण समोर आले आहेत. हे रुग्ण २९ दिवसांत दुपट्ट झाले. ११० दिवसांत एक लाखांपर्यंत कोरोना संक्रमण झाले आहे.

काँग्रेसने एक व्हिडिओ जारी करून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की, मोदी सरकार आणि भाजपचे नेते कोरोनाबद्दल किती गंभीर आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कैलाश विजयवर्गीय, अर्जुन मेघवाल, भाजपचे खासदार वीरेंद्र सिंह, आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे, अनुराग शर्मा, साक्षी महाराज, अनिल विज या नेत्यांची नावे आणि त्यांची वक्तव्ये या व्हिडिओमध्ये आहेत. कोणी शाकाहारी व्हा असा सल्ला देत आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकार कोरोनाबाबत गंभीर नसल्यामुळे लोकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. सरकार कोणाचा सल्ला घेत आहे ना कोणाशी संवाद साधत आहे, असेही त्यात म्हटले.

Web Title: Differences in the Gandhi family; Leaders who wrote letters to congress chief Sonia Gandhi are angry over some decisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.